HW News Marathi
महाराष्ट्र

यंदाच्या २४ महिला आमदार विधानसभेत

मुंबई। राज्यातील विधानसभा निवडणुकीत २३५ महिला निवडणुकीच्या मैदान उतरल्या होत्या. त्यांच्यापैकी 24 महिला निवडून आल्या आहेत. या २४ पैकी यातील निम्म्या म्हणजे १२ महिला भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या आहेत. २०१४त्या विधानसभेत २० महिला आमदार होत्या. यावेळी त्यात चौघींची भर पडली आहे. इतक्या महिला आमदार सभागृहात असण्याची ही पहिलीच वेळ आहे.

काँग्रेसच्या पाच, तर शिवसेनेच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन महिला आमदार झाल्या असून, दोन अपक्ष महिलाचा यात समावेश आहेत. २०१४ च्या निवडणुकीत फक्‍त २० महिला आमदार निवडून होत्या. त्यामुळे २०१४च्या तुलनेत यंदा त्यात चार महिला आमदारांची भर पडली असून, हा आकडा २४वर पोहोचला आहे. १९६२ च्या निवडणुकीत १३ महिला आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

यंदाच्या निवडणुकीत १२ विद्यमान महिला आमदार पुन्हा विजयी झाल्या आहेत. यापैकी आठ आमदार भाजपच्या तर तीन काँग्रेस आणि एक राष्ट्रवादीच्या आहेत. यात मंदा म्हात्रे, मनीषा चौधरी, विद्या ठाकूर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, माधुरी मिसाळ, मोनिका राजळे, भारती लव्हेकर, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड आणि सुमनताई पाटील यांचा समावेश आहे.

विधानसभेतील २४ महिला आमदार

भाजपमधील महिला आमदार

1. मंदा म्हात्रे – बेलापूर

2. मनिषा चौधरी – दहिसर

3. विद्या ठाकूर – गोरेगाव

4. भारती लव्हेकर – वर्सोवा

5. माधुरी मिसाळ – पर्वती

6. मुक्ता टिळक – कसबापेठ

7. देवयानी फरांदे – नाशिक मध्य

8. सीमा हिरे – नाशिक पश्चिम

9. श्वेता महाले – चिखली

10. मेघना बोर्डीकर – जिंतूर

11. नमिता मुंदडा – केज

12. मोनिका राजळे – शेवगाव

शिवसेनेमधील महिला आमदार

1. यामिनी जाधव – भायखळा

2. लता सोनवणे – चोपडा

काँग्रेसमधील महिला आमदार

1. वर्षा गायकवाड – धारावी

2. प्रणिती शिंदे – सोलापूर मध्य

3. प्रतिभा धानोरकर – वरोरा

4. सुलभा खोडके – अमरावती

5. यशोमती ठाकूर – तिवसा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील महिला आमदार

1. सरोज अहिरे – देवळाली

2. सुमनताई पाटील – तासगाव-कवठेमहंकाळ

3. अदिती तटकरे – श्रीवर्धन

अपक्ष महिला आमदार

1. गीता जैन, भाजप बंडखोर – मीरा-भाईंदर

2. मंजुळा गावित – साक्री

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नव्या गृहमंत्र्यांकडून पोलीस दलाच्या ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न ! फडणवीसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना लांब ठेवणार ? 

News Desk

राज ठाकरेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर गंभीर आरोप!

News Desk

चंद्रकांत पाटील को गुस्सा क्यू आता है? हसन मुश्रीफ म्हणतात…

News Desk