HW News Marathi
महाराष्ट्र

सरकारी नोकऱ्यांमध्ये अडीच लाख पदे रिक्त

मुंबई | शासनाच्या विविध विभाग आणि जिल्हा परिषदमध्ये सुमारे २ लाख ५० हजार पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्ती झाल्यानंतर नोकर भरती न केल्याने बाकीच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहेत. दरवर्षी किमान ५० हजार सरकारी कर्मचारी सेवा निवृत्त होतात. विविध विभागांमध्ये ६ लाख ९६ हजार ४१५ पदे रिक्त आहेत. तर जिल्हा परिषदेतील पदांसाठी मान्यता दिली गेली आहे. परंतु कित्येक वर्षांपासून मंजूर पदे भरण्यात आलेली नाहीत.

१९८९-९९ या काळामध्ये मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आणलेल्या झिरो बजेटमुळे राज्यातील नोकर भरतीवर परिणाम झाला. त्यामुळे बेकारीचे प्रमाण वाढ गेले आहे. सर्वाधिक पदे गृह विभागात रिक्त आहेत. तसेच अल्पसंख्याक व पर्यावरण विभागाने आपली मंजूर पदे भरली आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये किमान १ लाख कर्मचारी निवृत्त झाले असून ही पदे भरण्यात आलेली नाहीत. अनेकदा मागणी करून सुद्धा शासनाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. अशी खंत महाराष्ट्र शासनाने व्यक्त केली.

रिक्त पदे असलेली विभाग

  • मराठी विभाग – २१४ पदे
  • शासनाच्या सर्व विभागातील – १ लाख ३० हजार ५१
  • जिल्हा परिषदातील -२६ हजार ६९८ पदे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अनाथ बालकांसाठी 5 लाखाची मदत, जिल्यातील एकही बालक वंचित राहणार नाही – यशोमती ठाकूर

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, पायलटच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

News Desk

हिवाळी अधिवेशनच्या कालावधीवरून फडणवीस नाराज; म्हणाले… सरकारला रस नाही!

News Desk
राजकारण

पर्यावरण दिनी राजकीय प्रदूषण नको | अदित्य ठाकरे

swarit

मुंबई | आज जागतिक पर्यावरण दिना निमित्त मुंबई येथील दादर चौपाटीवर बीच प्लीज या संस्थेने स्वच्छ समुद्र किनारा ही मोहिम हाती घेतली होती. या संस्थेत सर्व महाविद्यालयीन तरूण सहभागी झाले होते. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहिले होते.

यावेळी अदित्य ठाकरेंनी राजकीय साफसफाई पण सध्या सुरू आहे तसेच अमित शहा यांच्या भेटीवर भाष्य करणे टाळले. भाजप अध्यक्ष अमित शहा बुधवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. याबाबत शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मात्र, आज जागतिक पर्यावरण दिन असून या दिनी राजकीय प्रदूषण आणू इच्छित नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

२०१९ पर्यंत तरी प्लास्टिक मुक्त राहू काही वर्षांपूर्वी प्लास्टिक हे पर्याय म्हणून पाहिले जायचे पण आता हा पर्याय भारी पडतोय. पर्यावरण सुधारण्यासाठी माझे हे म्हणणे आहे. तसेच २०१९ पर्यंत तरी प्लास्टिक मुक्त राहू असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणालेत.

दादर चौपाटीवर पर्यावरण दिन साजरा

आज ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दादरच्या चौपाटीवर स्वच्छता करण्यात आली. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गेले ४३ आठवडे बीच प्लीज या संस्थेने दादर येथील समुद्र किनारा स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. संस्थेत सर्व महाविद्यालयीन तरूण सहभागी झाले आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दादर येथे मंगळवारी भेट दिली.

Related posts

“बांठिया आयोगाच्या अहवालातील त्रुटींवर उपाययोजना करा”, छगन भुजबळ यांची मागणी

Aprna

जे दोषी असतील त्यांच्यावरच कारवाई होणार !

News Desk

बांदेकरांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

News Desk