लोकसभेमध्ये शिमला येथील खासदार विरेंद्र काश्यम आणि इतर दहा खासदारांनी याबाबत प्रश्न विचारला होता. यावर गंगवार यांनी लोकसभेत याची लेखी माहिती दिली आहे. प्राप्तिकर विभागानं केलेल्या कारवाईत 513 कोटी रुपयांच्या रोख रकमेसह सोने, दागिने आणि चांदीचा समावेश असलेली एकूण 610 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तर 110 कोटी रुपये किंमतीच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

आता पर्यंत 5100 जणांना नोटीस पाठविण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे १0 डिसेंबरपयर्ंत 12.44 लाख रुपये किंमतीच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्याचेही गंगवार यांनी सांगितले.