HW News Marathi
महाराष्ट्र

पंढरपूरच्या महिलेचा सौदी अरेबियात छळ

महिलेला भारतात आणण्यासाठी खरादी कुटुंबाची याचना

अभिराज उबाळे

पंढरपूर :- पंढरपूरातील संतपेठ भागात राहणा-या रिजवाना शब्बीर खरादी ( वय ५०) या सौदी अरेबियात कामासाठी गेल्या असता त्यांना तेथे त्रास होत असल्याची माहिती जहीर खरादी या त्यांच्या मुलाने दिलीय . खाजगी एजंट मार्फत त्या सौदीला गेल्या आहेत. एक महिन्यापूर्वी रिजवान यांनी सोलापूरला आईकडे जाते म्हणून घर सोडले आणि त्या सौदी इथं गेल्या आहेत.

रिजवाना यांच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे . पती शब्बीर हे सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करतात, तर दोन मुले मजुरी करतात . आपणही काम करून पैसा मिळवावा या हेतूने त्यांनी सोलापुरातील एजंट मार्फत पुणे आणि मुंबई येथील एजंटला संपर्क केला. सहा महिन्यांपासून त्यांची सौदीला जाण्याची तयारी सुरु होती . आपण हज यात्रेला जाण्यासाठी पासपोर्ट काढत असल्याचे त्यांनी घरच्यांना सांगितले होते .

मुंबईत पोहोचल्यावर रिजवाना यांना छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळच्या एका लॉज मध्ये यांना बोलावून घेण्यात आले . आणि त्याच दिवशी रात्री नऊ च्या विमानाने त्यांना सौदीला पाठवण्यात आले. विमानात बसल्यानंतर त्यांनी आपला मोठा मुलगा जहीरला मी कामासाठी सौदीला जात असल्याचा निरोप दिला आणि फोन बंद केला . महिन्याभराच्या काळात तीन वेळा जहीरचे आईसोबत बोलणे झाले. तिस-यांदा मात्र रिजवानाने आपल्याला येथे त्रास दिला जातोय, जेवणही वेळेवर मिळत नाही मला भारतात परत यायचे आहे , असे जहीरला सांगितले . त्यानंतर खरादी कुटुंबाची रिजवाना यांना भारतात परत आणण्यासाठी धावपळ सुरु झाली. सध्या खरादी कुटुंब तणावात असून त्यांनी सौदीतील भारतीय दूतावासा मध्ये संपर्क केलाय. तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिसांच्या आहार भत्त्यात वाढ

News Desk

आदित्य ठाकरेंना लग्नासाठी मुलगी शोधायची असेल तरी उद्धव ठाकरे केंद्राला पत्र लिहतील!

News Desk

बुरमराहच्या ‘नो बॉल’वर जयपूर पोलिसांची फ्री हिट

News Desk