HW News Marathi
महाराष्ट्र

मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे ४ शिलेदार ! राणे ,भागवत कऱ्हाड ,कपील पाटील ,भारती पवार…

नवी दिल्ली। नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मोदी सरकार २ चा हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार असून विशेष बाब म्हणजे हयात महाराष्ट्रातील ४ नव्या चेहऱ्यांचा समावेश होणार आहे. ज्यामध्ये नारायण राणे, कपिल पाटील,भारती पवार, आणि भागवत कराड यांची वर्णी लागली आहे. मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज (७जुलै) संध्याकाळी ६ वाजता पार पडणार आहे. तर महाराष्ट्रातील मोदी कॅबिनेटमध्ये ४ नेत्यांची वर्णी लागली आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत जलद आणि महत्वपूर्ण घडामोडी घडत असल्याचं देखिल पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाकडे देशाचे लक्ष आहे. सध्या मोदी कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला गेला आहे.

१) कोण आहेत नारायण राणे?

नारायण तातू राणे यांचा जन्म २० एप्रिल १९५२रोजी कोकणात झाला. मोठा जनाधार असलेल्या कोकणातील नेत्यांमध्ये नारायण राणेंचा समावेश होतो. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आक्रमक स्वभावाचे नारायण राणे शिवसेनेत वेगाने पायऱ्या चढत वर गेले. सुरुवातीला चेंबुरमध्ये शाखाप्रमुख असलेले राणे १९८५ साली मुंबई महानगरापालिकेच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर १९९०साली कणकवली-मालवण मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. १९९५ मध्ये युतीची सत्ता आल्यावर त्यांच्याकडे दुग्धव्यवसाय विकास, पशु संवर्धन, मत्स्यव्यवसाय, खार जमिनी, विशेष सहाय्य व पुनर्वसन, उद्योग या खात्यांचा कारभार सोपवण्यात आला.

१९९७ साली त्यांच्याकडे महसूल खाते सोपवण्यात आले. मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर १९९८ ते ९९ या काळात त्यांनी या पदाची धुरा सांभाळली. २००५ साली शिवसेना सोडून ते काँग्रेसमध्ये गेले. २००९मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना उद्योग खातं मिळाले. त्यानंतर आता भाजपमध्ये आल्यानंतर नारायण राणे यांची राज्यसभेवर वर्णी लागली.

२)कोण आहेत भारती पवार?

भारती पवार राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष होत्या, तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं काम आहे. स्वत: पेशाने एक डॉक्टर असल्यानं एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा हा भारती पवारांचा आहे, भारती पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून कार्यकर्त्यांचं मोठं जाळं निर्माण केलं असून त्यांचा ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क आणि कामं २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवार असताना, लाखांच्या घरात त्यांनी मतं मिळवलीत तर राष्ट्रवादीनं उमेदवार आयात केल्यानं ग्रामीण भागात भारती पवारांना मोठी सहानुभुती मिळाली होती. स्वत:ची यंत्रणा आणि आता सत्ताधारी भाजपची ताकद मिळाल्यानं दिंडोरीत त्यांनी ताकद वाढली. त्यानंतर मुंबईत भाजप प्रवेशांनंतर भारती पवार यांनी पक्ष देईल ती जवाबदारी पार पाडू असं सांगितलं. भाजप महिलांचा योग्य सन्मान राखणारा पक्ष असल्याचं सूचक वक्तव्य भारती पवार यांनी केलं.

३) कोण आहेत भागवत कराड?

चिखली ता. अहमदपूर जि.लातूर हे भागवत कराड यांच मूळ गाव त्यांचं सातवी पर्यंतचे शिक्षण चिखली या जि. प.च्या शाळेत झाले तर ८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण अंधोरी जि. प. शाळेत झाले, त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांनी संस्थेच्या मोफत वसतीगृहात राहून अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून प्री मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले, तर १९७२ साली त्यांनी औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयातून एमबीबीएस व एम.एस. (जनरल सर्जरी) ही पदवी त्यांनी संपादन केली. एम.एस. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातील वैद्यकीय क्षेत्रातील अति उच्च पदवी एम. सीएच (पेडियाट्रीक) ही पदवी त्यांनी मिळवली. मराठवाड्यातील अशा प्रकारची पदवी घेणारे ते वैद्यकीय क्षेत्रातील पहिले डॉक्टर ठरले. मुंडेंनी त्यांच्या कामाची प्रशंसा करून त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. तर १९९५ साली ते संभाजीनगर महानगरपालिका कोटला कॉलनी वॉर्डातून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे उपमहापौर आणि नंतर औरंगाबाद शहराचे दोन वेळा महापौर होण्याचा भागवत यांना मान मिळाला. १९९५ ते २००९ या कालावधीत औरंगाबाद महापालिकेत तीन वेळा नगरसेवक तर १९९७ ते १९९८ औरंगाबादचे उपमहापौर म्हणून ते राहिलेत आणि २००० ते २००१ आणि २००६ ते २००७ औरंगाबादचे महापौर पुन्हा २००९ मध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी त्यांना मिळाली. तर आता केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली.

४) कोण आहेत कपिल पवार?

५ मार्च १९६१ साली कपिल पवार यांचा हायवे दिवे ता.भिवंडी येथे जन्म झाला त्यांनंतर बी ए मुंबई विद्यापीठ येथून पूर्ण झाल, सरपंच पदाचा पाहिल्या वेळी त्यांना १९९८ ते १९९२ साली मान मिळाला, तर ग्रामपंचायत दिवे अंजुर सदस्य म्हणून १९९२ ते १९९६ पर्यन्त कारकीर्द राहिली पुढे पंचायत समिती भिवंडी पद, त्यानंतर सभापती म्हणून १९९७ ला राहिले, पंचायत समिती भिवंडी सदस्य म्हणून २००२ ते २००७, जिल्हा परिषद ठाणे सभापती २००५ ते २००७ जिल्हा परिषद कृषी समिती

अध्यक्ष म्हणून २००९ ते २०१२ जिल्हा परिषद ठाणे अध्यक्ष ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे सतत २०१० ते २०११ आणि २०११ ते २०१२ पर्यन्त ते राहिले. या दोन वर्षात सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कार कपिल पाटील यांना प्राप्त झाला आहे. या सगळ्या कारकिर्दीनंतर आता केंद्रात वर्णी लागली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘बा विठ्ठला… समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर’, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे

Aprna

अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा मिळण्याची शक्यता

News Desk

कोविड सेंटरला लागलेल्या आगीत झालेले मृत्यू हे शिवसेनेच्या टक्केवारीचे बळी – अतुल भातखळकर 

News Desk