HW Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूर आणि सांगली महापूरात आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू

पुणे। महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ४३जणांचा मृत्यू झाला असून फक्त सांगली जिल्ह्यात २१ बळी आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील सात जणांचा नागरिकांचा समावेश आहे. याचबरोबर सातारा आणि पुणे जिल्ह्यातही प्रत्येकी सात जणांचा समावेश आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी आज सोमवारी (१२ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत दिली

म्हैसकर म्हणाले, की पुणे विभागामध्ये पडलेला पाऊस रेकॉर्डब्रेक आहे. यामध्ये अनेक प्रकारची हानी झाली आहे रविवारी (११ ऑगस्ट) दोन मृतदेह सांगली जिल्ह्यामध्ये सापडले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही तर तीन जण बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्या व्यक्तींमध्ये एक व्यक्ती सांगली तर एक व्यक्ती कोल्हापूर आणि एक व्यक्ती सातारचे आहेत.

Related posts

मी सचिन अंदुरेच्या मदतीने दाभोलकरांवर गोळीबार केला !

News Desk

कुठे जन्मले दुतोंडी बालक

News Desk

राज्यात सत्तेसाठी केलेली युती महाराष्ट्राला पटणारी नाही !

News Desk