HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील ५ मृत्यू डेल्टा प्लसमुळे झाले नाहीत, आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती!

मुंबई। राज्यात डेल्टा प्लसच्या ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र या ५ रुग्णांचा मृत्यू डेल्टा प्लसमुळेच झाला असेल असं म्हणता येणार नाही असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतरही काही रुग्णांना डेल्टा प्लसची लागण झाली आहे. सध्या राज्यात ८० टक्के डेल्टाचे आहेत. मात्र काळजी करण्याचे काही कारण नसल्याचे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. यानंतर मुंबईत तसेच अन्य जिल्ह्यांत डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्री यांचे स्पष्टीकरण

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. यावेळी राजेश टोपेंनी डेल्टा प्लस रुग्णांच्या मृत्यूविषयी भाष्य केलं आहे. राज्यातील ५ रुग्णांचा मृत्यू डेल्टा प्लसमुळेच झाला आहे असे म्हणता येणार नाही. या रुग्णांच्या भूतकाळाची माहिती काढण्यात येत आहे. सध्या राज्यात ८० टक्के डेल्टा प्लसचे रुग्ण आहेत. यामधील डेल्टा प्लस व्हेरियंटसचे ६६ रुग्ण आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

लसीकरण घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा त्यांना कोरोनाची लागण

राज्यात सध्या डेल्टाचे ८० टक्के रुग्ण आहेत. यामधून डेल्टाचे रुग्ण किती म्युटेट होत आहेत. डेल्टा प्लस ६६ रुग्ण झाले जरी असतील तरी त्यांनी लस घेतली आहे का? कुठे त्यांना कोरोनाची लागण झाली? अशी सर्व माहिती घेत आहोत. असे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तर एकुण १८ लोकांनी लसीकरण घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण ५ जणांचे मृत्यू झाले आहेत.

पुण्यात डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण

कोरोना संकटाचं संकट असताना डेल्टा प्लसचेही रुग्ण वाढत असल्याचं दिसत आहे. मुंबईत शुक्रवारी डेल्टा प्लसमुळे एका महिलेच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर आता पुण्यातही डेल्टा प्लसचा रुग्ण सापडला आहे. पुणे शहरात डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण आढळला असून जिल्ह्यातील एकूण संख्या सहा आहे. राज्यात ८० टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळत असल्याचं दिसून येते आहे. या सर्वेक्षणातून राज्यात आतापर्यंत ६६ डेल्टा प्लस व्हेरीयंटचे रुग्ण आढळून आले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पहिल्यांदाच पोलीस महासंचालकांना विश्वासात न घेता पोलीस विभागाचा कारभार चाललाय!

News Desk

HW Exclusive | “आमच्या मुलीला ‘हा’ स्ट्रेस होता”, पूजा चव्हाणच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश, आपत्कालीन मदत यंत्रणेचे मानले आभार

News Desk