HW Marathi
महाराष्ट्र

अंत्यविधी करून परतताना ६ जणांचा मृत्यू

बेळगाव | उसाने भरलेल्या ट्रकला पाठीमागून मोटारीची जोरदार धडक बसून नातेवाईकाचे अंत्यविधी करुन परतणाऱ्या गाडीचा बेळगावमधील गोकाक तालुक्याजवळ काल(३ डिसेंबर) रात्री अपघात झाला आहे. या अपघातात सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर १० जण जखमी झाले आहेत. सर्व मृत महिला व जखमी सौंदत्ती तालुक्यातील माडमगेरी व यरझरवी येथील रहिवासी आहेत.

मृतांमध्ये गंगव्वा हुरळी (वय ३०), काशवा खंडरी (७०), यल्लव्वा पुजारी (४५), यल्लव्वा गुंडाप्पानवर (४०), रेणुका सोपडला (३४) व  मल्लव्वा खंडरी (५०) अशी मृतांची नावे आहेत. सौंदत्ती तालुक्यातील सुमारे पंधराहून अधिक जण बोलेरोमधून गोकाक फॉल्स येथे अंत्ययात्रेला गेले होते. अंत्ययात्रा आटोपून परतताना हिरेनंदी येथे बंद पडलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला बोलेरोची पाठीमागून जोरदार धडक बसली.

तसेच मोटारीतील चार महिला जागीच ठार झाल्या. उर्वरित दोघींचा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असताना मृत्यू झाला, याशिवाय या घटनेत दहा जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची गोकाक पोलिसांत नोंद झाली आहे.

 

 

Related posts

सोलापूरची घराणेशाही आणि वारसा .

News Desk

दारू विक्री आणि बँकेच्या ट्रांजेक्शनवर आयकर विभागाचे लक्ष

News Desk

पेट्रोल ६ पैशांनी तर डिझेल १९ पैशांनी वाढले

News Desk