HW News Marathi
महाराष्ट्र

एका पोलिसामुळे सरकारला फरक पडत नाही ! पवारांनी काढली भाजपची हवा

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून API सचिन वाझे यांच्यावर मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी प्रचंड आरोप होत आहेत.सचिन वाझे यांना यांसंदर्भात NIA ने अटक करत 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे आणि प्रशासनाने त्यांचे दुसऱ्यांदा निलंबनदेखील केलेलं आहे. या प्रकरणात महाविकासआघाडीवर प्रचंड टिका होत आहे.

भाजपकडून केल्या जाणाऱ्या या टिकेला आधी शरद पवारांनी “हा स्थानिक प्रश्न आहे” म्हणत फटकारले होते. त्यानंतर आज (१६ मार्च) दिल्ली येथील पत्रकार परिषदेतसुद्धा त्यांनी पुन्हा एकदा सचिन वाझे प्रकरणावर भाष्य केले आहे. शरद पवार म्हणाले, एका पोलिसामुळे सरकार काही अडचणीत येत नाही.या प्रकरणात जर कोणी अधिकाराचा गैरवापर करत असेल तर आम्ही NIA ला त्यात संपूर्ण पाठिंबा देऊ. तसेच महाविकासआघाडी सरकारचं चांगलं चाललय आणि कुठलेही मतभेद नाहीत, असे म्हणत पवारांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी लोकलने सीएसएमटी ते उल्हासनगर केला प्रवास!

News Desk

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : चौकशी आयोगाने ‘या’ सहा राजकीय पक्षांना पाठविले समन्स

Aprna

नवी मुंबईतील ए.पी.एम.सी मार्केटही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद

swarit