HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील एका मंत्र्याची आज विकेट पडणार ! चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा

कोल्हापूर । राज्यातील मुख्य विरोधीपक्ष असलेला भाजप गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकारणांवरून महाविकास आघाडी सरकारची कोंडी करताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोठा दावा केला आहे. “महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा आज राजीनामा होणार”, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी आज (१६ आज) कोल्हापुरात बोलताना केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणावरून राज्याचे राजकीय वातावरण पेटलेले असताना चंद्रकांत पाटील यांनी हा अत्यंत मोठा दावा केला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने “राज्यातील अनेक मंत्री एकाच वेळी दिल्लीला गेले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीला गेले आहेत. आणखी काही नेते दिल्लीत पोहोचल्याची चर्चा आहे. या सर्व घडामोडी पाहता एका मंत्र्याचा राजीनामा आज होण्याची शक्यता आहे. हे गृहमंत्री अनिल देशमुख तर नाहीत ना ?” असा सवाल विचारला. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले कि, “याबाबत मला माहित नाही. मात्र, आज एका मंत्र्यांची विकेट पडणार एवढेच मी सांगू शकतो.” चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाने राज्यात चर्चांना उधाण आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर

News Desk

हिवाळी अधिवेशनात कोण असणार अजित पवारांच्या हिटलिस्टवर 

News Desk

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारवर कर्ज काढण्याची वेळ येणार?

News Desk