HW News Marathi
Covid-19

मुंबईत दोन पोलिसांवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, पाठलाग करत पोलिसांनी आरोपीला केले अटक

मुंबई | कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनची योग्य अंबलबजावणी होण्यासाठी पोलीस जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहे. मात्र, पोलिसांवर हल्ले दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात नाका बंदीला असणाऱ्या दोन पोलिसांवर काल (८ मे) एका माथेफिरू तरुणाने हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात हे दोन्ही पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मरिन ड्राईव्हवर काल रात्री आकरा वाजता नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांनी तरुणाला हटकले. यानंतर बॅगमधून कोयता काढत पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम आणि पोलीस उपनिरीक्षक शेळके यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले. पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या तरुणांचा पाठलाग केला.

अखेर दोरी आणि लाठीच्या सहाय्याने आरोपीला अटक केली. त्यावेळी त्याने हातातील कोयत्याने वार केले, ज्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांवर हल्ले करणाऱ्या तरुणांवर कलम ३०७ सह भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हल्लेखोर तरुण कोयता घेऊन बाहेर का पडला? याचा तपास पोलिस करत आहेत.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्याच्या अनलॉक नियमांत बदल, सुरु झालेली ‘ही’ दुकाने होणार बंद!

News Desk

“…तरी महाराष्ट्राला लॉकडाऊनची गरज”, राजेश टोपेंचं ठाम मत

News Desk

हिंगोली जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४६ वर

News Desk