HW News Marathi
महाराष्ट्र

MPSCExam : राजकीय स्वार्थाला बळी पडू नका – आदित्य ठाकरे

मुंबई | राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर १४ मार्चला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढेढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरुन विद्यार्थ्यांचा रोष अनावर झाला आणि काल राज्यात पुण्यासह अेक जिल्ह्यांत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली होती. राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याववर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं आयोगाने म्हटलं आहे. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर २०२० मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली होती. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले की आठवड्याभरात ही परीक्षा घेतली जाईल.

या निर्णयावरुन राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने तर विरोध केलाच पण महाविकासआघाडी सरकारमधीलही काही नेत्यांनी या निर्णयाचा जाहीर निषेध करत परीक्षा १४ तारखेलाच व्हावी अशी मागणी केली होती. या मुद्यावर आता मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ‘ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांनी एमपीएससीच्या परीक्षांची तारीख उद्याच जाहीर होईल,असे आश्वासन दिले आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित व आरोग्यदायी वातावरणात परीक्षा देता याव्यात यासाठी सर्व खबरदारी घेतली जाईल. परीक्षांचे नियोजन करणारी महसूल विभागाची यंत्रणा सध्या कोविडसंदर्भातील कार्यात व्यस्त आहे ते परीक्षांसाठी येतील तेव्हा त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा धोका नसेल, हे पाहणे गरजेचे आहे मी विद्यार्थ्यांना नम्रपणे आवाहन करतो की इतरांच्या राजकीय स्वार्थाचे बळी होऊ नये’, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणा दाम्पत्यावर विजय वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला चित्रा वाघांचे सडेतोड उत्तर

Aprna

रात्री कोरोना असतो का? मनसेच्या प्रश्नाला शिवसेनेने दिले उत्तर

News Desk

राज्यातील १२ वीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार !

News Desk