HW News Marathi
महाराष्ट्र

राणा दाम्पत्यावर विजय वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला चित्रा वाघांचे सडेतोड उत्तर

मुंबई | आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांना वांद्रे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यावेळी राणा दाम्पत्याविरोधात काँग्रेस नेत्यांनी अपशब्द काढले आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राणा दाम्पत्यावर अपशब्ध वापरला, यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. सध्या वडेट्टीवारांचा व्हिडिओ वाघांनी ट्वीट करून त्यांच्यावर टीका केली. 

 “कुणाच्या घरी आंदोलनाला आमचा विरोध आहे, पण भारतात हनुमान चालिसा वाचणे हा देशद्रोह कसा? मी मंत्र्याला महिलांबद्दल खालच्या दर्जाची भाषा वापरण्यास मनाई करतो… जोपर्यंत स्त्रिया चप्पल घालून त्यांची पूजा करत नाहीत, तोपर्यंत त्यांचे मन काही थांबणार नाही,” असा व्हिडिओ वाघांनी वडेट्टीवारांचा ट्विटरवरून ट्वीट केला आहे. राणा दाम्पत्यांना हनुमान चालिसावरून झालेल्या नाट्यानंतर पोलिसांनी काल (२३ एप्रिल) अटक केले होते. राणा दाम्पत्याना वांद्रे न्यायालयाने काल (२४ एप्रिल) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ एप्रिलला होणार असून जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा भायखळा कारागृहात तर रवी राणांचा आर्थर रोड कारागृहात मुक्काम असणार आहे. तातडीने जामीनावर सुनावणी घेण्यास वांद्रे न्यायालयाने नकार दिला आहे. आणि सरकारी पक्ष २७ एप्रिलला आमचे लेखी म्हणणे मांडण्याचा सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत, विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे केले वाटप

News Desk

धक्कादायक ! ‘लॉकडाऊन’मुळे वाहन न मिळाल्याने दुचाकीवरुनच वडिलांचा मृतदेह घरी नेला

swarit

सचिन वाझेंनंतर अनिल देशमुख आणि परमवीर सिंग यांचीही हकालपट्टी करा ! | किरीट सोमय्या

News Desk