HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरेंची अनुपस्थिती!

मुंबई। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक होत आहे. मात्र या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. ओबीसी अन्य आरक्षणाबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही सहभागी होणार आहेत. सह्याद्री विश्रामगृहावर ही बैठक होत झाली. या बैठकीसाठी राज ठाकरेंसह इतरही अनेक नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. निमंत्रितांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, राजू शेट्टी यांचाही समावेश आहे.

पुनर्विचार याचिका दाखल केल्या होत्या

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक संस्थामधील ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर यातून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्नb आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द केलं आहे. महाविकास आघाडी सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे.

महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्याच्या कलम १२ (२)(सी) आणि राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनांनुसार आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत असेल तर ते अवैध आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या आदेशावर राज्य सरकार व इतरांनी पुनर्विचार याचिका दाखल केल्या होत्या. या सर्व याचिकांवर सुनावणी घेऊन मूळ आदेश कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्या होत्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘बँकेच्या ठेवीदारांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी केंद्राचं पाऊल…’, केंद्रीय अर्थमंत्र्यांची महत्त्वाची माहिती!

News Desk

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक सत्र सुरू

News Desk

भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे – देवेंद्र फडणवीस

News Desk