HW News Marathi
महाराष्ट्र

“वाझेंची नियुक्ती करू नका म्हणून शरद पवार, राऊत, देशमुखांना भेटलो”,अबू आझमींचा गौप्यस्फोट

मुंबई | मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आल्यानंतर रोज नवे खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं. हे प्रकरण शांत होत असतानाच आता समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी मोठं विधान केलं आहे. सचिन वाझे यांची नियुक्ती करू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटलो होतो,” असा गौप्यस्फोट आझमी यांनी केला आहे.

अबू आझमी यांनी माध्यमांशी बोलत असताना हा गौप्यस्फोट केला. आझमी यांनी वाझे यांच्या नियुक्तीवरून सरकारवर टीका केली असून, याला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. “वाझेंची नियुक्ती होणार असल्याचं कळल्यानंतर मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांना वाझेंना पोलीस दलात घेऊ नका, अशी विनंती केली होती,” असं वाझेंनी म्हटलं आहे.

“वाझेंना पोलीस दलात घेतलं जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर मी शरद पवार, संजय राऊत आणि देशमुखांना भेटलो होतो. पण परमबीर सिंह यांनी या दोघांना असा काय सल्ला दिला की त्यांना पोलीस दलात घेण्यात आलं, असा सवाल आझमी यांनी उपस्थित केला.“ख्वाजा युनुस हत्या प्रकरण सुरू असताना वाझेंना पोलीस दलात घेणं ही महाविकास आघाडीची सगळ्यात मोठी चूक होती. तसेच मी सत्तेत असूनही सांगतो की, ज्या दिवशी वाझेंचा विषय विरोधकांनी हातात घेतला, त्याच दिवशी त्यांना निलंबित करायला हवं होतं. पण वाझेंना निलंबित करण्यात आलं नाही. ही सरकारची दुसरी मोठी चूक होती,” अशी टीका आझमी यांनी केली.

“सचिन वाझे यांचे कॅरेक्टर पहिल्यापासून वाईट आहे. त्याला परमबीर सिंह दोषी आहेत. पैसे वसुली प्रकरणात सिंह यांनाच जबाबदार ठरवलं पाहिजे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी जर अधिकाऱ्यांना पैसे वसुलीचं टार्गेट दिलं होतं. तर सिंह यांनी पवार आणि मुख्यमंत्र्यांना का सांगितलं नाही. सिंह यांनीच पैसे वसुली केली आहे. त्यांच्याविरोधात पैसे वसुलीच्या अनेक केसेस सुरू आहेत,” असा दावाही आझमी यांनी केला.

डीव्हीआर, सीपीयू सापडला

मुकेश अंबानी धमकी प्रकरण आणि मनुसख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आल्यानंतर तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सध्या या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयए करत असून रोज नवनवे खुलासे होत आहेत. या दोन्ही प्रकरणांशी निगडीत असलेले सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचेही या तपासात समोर आले आहे.हेच पुरावे शोधण्याच्या प्रयत्नात एनआयएच्या हाती काही ठोस गोष्टी लागल्या आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी उपयुक्त ठरणारे डीव्हीआर, संगणकाचा सीपीयू आणि इतर काही गोष्टी एनआयएला सापडल्या आहेत. मिठी नदीत ही शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी एनआयएच्या अधिकाऱ्यांसोबत सचिन वाझे हेसुद्धा उपस्थित होते.

एनआयएकडून कसून तपास

मनसुख हिरेन यांचा मृत्यू तसेच मुकेश अंबानी यांना धमकी दिल्याचा प्रकार घडल्यानंतर या दोन्ही प्रकाराशी निगडीत असलेले अनेक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. तसेच या प्रकरणांच्या तपासासाठी मदत होणारे सीसीटीव्ही फुटेज साठवलेला डिव्हीआर, तसेच संगणकाचा सीपीयू नष्ट नदीत फेकण्यात आला होता. सचिन वाझे यांचे घर असलेल्या साकेत काँम्प्लेक्स या सोसायटीतील डीव्हीआरसुद्धा गायब होता.त्यानंतर एनआयएने तपास मोहीम राबवत गायब असलेले डीव्हीआर शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी मिठी नदीत एनआयएला डिव्हीआर आणि इतर सामान सापडले आहे. सचिन वाझे यांना घटनास्थळी नेऊन डिव्हीआर शोधण्यात आला. दरम्यान, डीव्हीआर आणि सीपीयून सापडल्यामुळे एनआयएचे हे मोठे यश असून या दोन्ही प्रकरणांची लवकर उकल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना राज्यपालांनी सांगितला यशाचा मूलमंत्र

News Desk

मोतीलाल व्होरा यांच्या निधनाने अत्यंत निष्ठावान व अनुभवी नेतृत्व हरपले ! | बाळासाहेब थोरात

News Desk

Bhandara Hospital Fire | आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ! प्रकाश आंबेडकरांची मागणी

News Desk