HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात, २ जणांचा मृत्यू

कामशेत | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुणे-मुंबई लेनवर थांबलेल्या डंपर गाडीला पाठीमागून ठोकरल्याने झालेल्या अपघातात मुंबईच्या २ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार ( ३ डिसेंबर ) रोजी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पिंपलोळी गावाच्या हद्दीत पुणे मुंबई लेनवर किलोमीटर नं . ६९/४०० जवळ थांबलेला डंपर ( एम एच १६ ए वाय ८९६९ ) ला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या महिंद्रा टीयुव्ही ३०० ( एम एच ०४ जी डी ९७९१ ) ची चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती डंपरवर पाठीमागून धडकली.

या अपघातात महिंद्रा गाडीतील जावेद इस्माईल शेख ( वय ४० रा.कुर्ला ) इस्माईल शेख ( वय ६५ रा. कुर्ला ) यांचा जागीच मृत्यू झाला असून इतर तीन जण किरकोळ जखमी झाली असून त्यांची नावे अद्याप समजली नाही. जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिसांच्या शिपाई पदासाठी इंजिनिअर आणि डॉक्टरांचे अर्ज

News Desk

फसव्या सरकारचे ‘काउन्ट डाऊन’ सुरु

Adil

देवेंद्र फडणवीस आज साताऱ्यात पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी रवाना!

News Desk