HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरे यांच्यापाठोपाठ आता उद्धव ठाकरेही करणार नव्या घरात गृहप्रवेश

मुंबई। नुकतंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन घरात गृहप्रवेश केला. आता राज ठाकरे यांच्या पाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह नव्या घरात गृहप्रवेश करणार आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच कुटुंबीयांसह मातोश्री-2 मध्ये गृहप्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री बंगल्यासमोरच मातोश्री-२’ इमारत बांधण्यात आली आहे.

राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा नवीन घरात गृहप्रवेश करणार

राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा नवीन घरात गृहप्रवेश करणार असल्यानं याची चर्चा रंगली आहे.6 नोव्हेंबरला राज ठाकरे यांनी आपल्या नव्या घरात प्रवेश केला. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते नव्या घराच्या नामफलकाचं पूजन करण्यात आलं. शिवतीर्थ असं या नव्या घराचं नाव असणार आहे. राज ठाकरे यांच्या नव्या शिवतीर्थ वास्तुच्या वरती भगवा झेंडा फडकावत ठाकरे कुटूंबीयांनी गृहप्रवेश केला आहे. दादर येथील ‘कृष्णकुंज’शेजारीच नवी पाच मजली इमारत बांधली आहे.

कृष्णकुंज शेजारीच राज ठाकरेंचं 5 मजली घर

राज ठाकरे आणि कृष्णकुंज हे समीकरणच वेगळं आहे. दादरमध्ये कृष्णकुंज म्हणजे राज ठाकरे यांचं घर डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र आता राज ठाकरेंची निवासस्थानाची ओळख आता बदलली आहे. कृष्णकुंज शेजारीच 5 मजली इमारत हेच राज ठाकरेंचं नवं घर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे कृष्णकुंज येथे वास्तव्यास आहेत. राज ठाकरे यांना भेटायचं झाल्यास सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते कृष्णकुंजवर भेटायला येतात.कृष्णकुंज शेजारीच राज ठाकरेंचं 5 मजली घर असेल. घराच्या पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था केली आहे. तसंच याच इमारतीत कार्यालयही असतील. या इमारतीत पक्षाच्या बैठका, भेटीगाठी आयोजित करण्यात येतील. अन्य मजल्यांवर ठाकरे कुटुंबाची राहण्याची व्यवस्था केली आहे. राज ठाकरेंच्या या नव्या घरात भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आलं आहे. या नव्या घराच्या उभारणीचे काम अंदाजे 2 ते 2.5 वर्षे सुरू होतं. घराचा दर्शनी भाग शिवाजी पार्कच्या दिशेनं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुन्हा दाखल करणं तुमची जबाबदारी, तुम्ही तुमच्या कर्तव्यात कमी पडलात, हायकोर्टाने परमबीर सिंगांना फटकारले

News Desk

भाजपची तिरंगा एकता रॅली

News Desk

भाषणात व्यत्यय आणणाऱ्यांवर अजित पवार संतापले, म्हणाले….

Manasi Devkar