HW News Marathi
महाराष्ट्र

स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांसारखं अभ्यासू… दूरदृष्टीचं नेतृत्व लाभल्यानेच महाराष्ट्र आजची प्रगती करु शकला – अजित पवार

मुंबई | स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांसारखं अभ्यासू… दूरदृष्टीचे…कुशल नेतृत्व… लाभल्यामुळेच महाराष्ट्र आजची प्रगती करु शकला अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील ‘जलक्रांती’चे जनक… माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्ताने (१४ जुलै ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे.

महाराष्ट्राच्या जडणघडणीतील स्वर्गीय चव्हाणसाहेबांचे योगदान कधीही विसरता येणार नाही अशा शब्दात आपल्या भावनाही अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

यंदा स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांचे जन्मशताब्दी वर्ष असून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे. स्वर्गीय चव्हाणसाहेबांनी केलेल्या जलक्रांतीचे राज्याच्या विकासात मोठं योगदान आहे. या योगदानाची माहिती, महत्व लोकांपर्यंत नेण्यासाठी, जलसंपदा, जलसंधारण, पाणीपुरवठ्याच्या क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या नावाचा ‘जलभूषण’ पुरस्कार देऊन यंदा गौरवण्यात येत आहे.

उद्या त्यांच्यावरील गौरवग्रंथाचे, मासिक ‘लोकराज्य’ विशेषांकाचे प्रकाशन करुन त्यांच्याबद्दलचा आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी राज्यात आणि केंद्रात अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी पार पाडली. ती पार पाडताना महाराष्ट्राचा गौरव वाढवला. सोपवलेल्या प्रत्येक जबाबदारीला, पदाला न्याय दिला. केंद्रात, राज्यात कार्याचा, व्यक्तिमत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवला. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी राज्यातील प्रशासनाला शिस्त लावून इथल्या विकासाला खऱ्या अर्थाने गती दिली. त्यांनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी, घेतलेले निर्णय हे आपल्या सर्वांना आजही मार्गदर्शक, प्रेरणादायी आहेत अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ए भाई’ अमृता फडणवीस मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगतापांवर का भडकल्या ?

News Desk

“राणेंना संपवणं अशक्य, विरोधकांना अनेक जन्म घ्यावे लागतील”

Ruchita Chowdhary

नागपूरमध्ये पराभव झाल्याने एका गटाला खूप उकळ्या फुटत आहेत, पवारांचा भाजपला टोला

News Desk