HW News Marathi
महाराष्ट्र

चुकीचे काम केले तर जेलमध्ये चक्की पिसायला पाठवेन – अजित पवार 

बारामती | बारामतीत मुख्यमंत्री रोजगार निर्मितीअंतर्गत बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या संधी या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली. बारामतीतील विरोधकांचा ही जित्राबं लय वाईट अशा शब्दात समाचार घेतला. चुकीचे काम केले तर जेलमध्ये चक्की पिसायला पाठवेन या शब्दात पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली आहे.

अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही मध्यस्थ, दलालाची गरज नाही. बेरोजगारांना काम मिळावे यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, त्यात कुचराई करून नये. बोगस लाभार्थी नकोत. पात्रता, गरज असणाऱ्यानांच लाभ द्या. कोणी यात पैसे खायचा प्रयत्न कला तर जेलमध्ये जावे लागेल. मग तेथे चक्की पिसावी लागेल, अशा शब्दात पवार यांनी पदाधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.

मी आता साठीच्या पुढे गेलो आहे, परंतु जसजसे वय वाढतेय तसा उत्साह वाढतोय. मी कामाच्या उत्साहासंबंधी बोलतोय, नाही तर तुम्हाला वेगळेच काही वाटायचे, अशी मिश्किल टिपण्णी पवार यांनी केली. बारामतीत कोणी चुकीच्या गोष्टी करत असेल तर त्यांच्यावर अॅक्शन घ्या, असे आदेश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले.

बारामतीकरांनी ज्या विश्वासाने आमच्यावर प्रेम केले, त्यातून उतराई होण्यासाठी सकाळपासूनच कामाला सुरुवात केली जात आहे. विविध कामे मार्गी लावली जात आहेत. सूर्य उगवल्यावर जरा दिसायला लागल्यावर मी कामाला सुरुवात करतो, नाही तर रात्री पण काम केले असते, अशी टीपण्णी पवार यांनी केल्यावर हशा पिकला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रजासत्ताक दिनी राज्यभरात ‘या’ वेळी शासकीय ध्वजारोहण होणार

Aprna

लवकर जग कोरोनामुक्त होऊ दे, उपमुख्यमंत्र्यांचं विठुरायाकडे साकडं!

News Desk

हे तर गलिच्छ राजकारण, सुशांत सिंह राजपूत आत्म्हत्येप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी सोडले मौन

News Desk