HW News Marathi
महाराष्ट्र

‘ई-कुबेर’प्रणालीमुळे उपकोषागार कार्यालयाचे कामकाज जलद, सुलभ, सुरक्षित, विश्वासार्ह होण्यास मदत होईल! – अजित पवार

मुंबई | रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयकृत बँकांसाठी विकसित केलेल्या ‘ई-कुबेर’ प्रणालीच्या वापराने कोषागारांचे कामकाज जलद, सुलभ, सुरक्षित, विश्वासार्ह होणार असून ‘ई-कुबेर’ प्रणाली भविष्यात राज्यातील सर्व कोषागारे व उपकोषागारांमध्ये कार्यान्वीत करण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (मंगळवार, २९ मार्च) व्यक्त केला. मुळशी (जि. पुणे) उपकोषागार कार्यालयातील ‘ई-कुबेर’ या रियल टाईम व्हाऊचर जनरेशन प्रणालीचे उद्घाटन अजित पवार यांनी मंत्रालयातून ऑनलाईन पद्धतीने केले.

राज्य व केंद्रशासन, राष्ट्रीयकृत बँका, सार्वजनिक उपक्रमांना वित्तीय सेवा देणारी सुरक्षित व सर्वसमावेशक प्रणाली म्हणून ‘ई-कुबेर’ प्रणालीची ओळख आहे. वापरायला सहज, सुरक्षित असणाऱ्या या प्रणालीमुळे कोषागार कार्यालयांच्या कामकाजाचा वेग वाढणार आहे. ‘ई-कुबेर’ प्रणालीमुळे ‘चेक’ क्लिअरींग तसेच प्रदानाचा कालावधी कमी होईल. शासकीय निधी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या बँक खात्यात पडून राहणार नाही. कोषागार कार्यालयासाठी उपयुक्त ठरलेल्या या प्रणालीचे प्रशिक्षण कोषागार कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घ्यावे, अशी सूचनाही अजित पवार यांनी केली.

अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन झालेल्या या कार्यक्रमाला मंत्रालयातून लेखा व कोषागार संचालनालयाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, लेखा व कोषागार संचालक वैभव राजेघाटगे, ‘एनआयसी’चे वरिष्ठ वैज्ञानिक बाळकृष्ण नायर, लेखा व कोषागार सहसंचालक स्वप्नजा सिंदकर आदी मान्यवर उपस्थित होते. व्हीसीद्वारे ‘एनआयसी’चे प्रमुख एस. पी. कुलश्रेष्ठ, सहसंचालक शुभांगी पाटोळे, ‘एनआयसी’चे वरिष्ठ वैज्ञानिक विशाल नळदुर्गकर, पुण्याचे वरिष्ठ कोषागर अधिकारी शेखर शेट्टे, मुळशीचे उपकोषागार अधिकारी चंद्रशेखर निसाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव राजेघाडगे यांनी केले तर आभार स्वप्नजा सिंदकर यांनी मानले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडी काही कायमस्वरुपाची नाही, फक्त ५ वर्षांसाठीच, नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

News Desk

मी गद्दार नाही, शिवसेनेचा खरा गद्दार अनिल परब आहे!; रामदास कदमांचा सवाल

Aprna

देश गरिबी महागाई मंदीच्या तिरडीवर ! गुजरातमध्येच पैशाचा पाऊस कसा ?

News Desk