HW News Marathi
महाराष्ट्र

‘105 असूनही सत्तेत नसल्याने कांड्या पेटवतायत’ अजित पवार भाजपवर बरसले

कराड | उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज कराडमध्ये आले होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनी आज ते कराडमध्ये गेले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी भाजपला चांगलेच सुनावले आहे.

सरकार पडणार आहे हे विरोधी पक्षांना सतत म्हणावंच लागतं. 1995 ते 99 च्या काळात आम्ही 80 जण आमदार म्हणून निवडून गेलेले होतो. कार्यकर्तेबरोबर राहण्याकरिता आणि आमदारांमध्ये चलबिचल राहू नये, यासाठी सारखं गाजर दाखवायचं काम करायचं असतं, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर पलटवार केला. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार कराडला गेले आहेत. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

सरकार पडणार की नाही याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी काल जयसिंगराव गायकवाडांच्या पक्ष प्रवेशात सरकार पडणार नसल्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यावर मी जास्त बोलणं योग्य दिसत नाही. शरद पवार आमच्या सर्वांचं दैवत आहे आणि त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, असंसुद्धा अजित पवार म्हणाले. ते १०५ लोकं असताना त्यांना सरकारमध्ये कामाची संधी मिळालेली नाही हे त्यांचं खरं दुखणं आहे. त्यामुळेच सारखं काही ना काही कांड्या पेटवायचं काम त्यांचं सुरू आहे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

आता जाणार, आता जाणार म्हणत होते, पण महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष झालं की नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केलेली आहे. जोपर्यंत त्या तिघांचे महाविकास आघाडीच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. ते मजबुतीनं उभे आहेत, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही हे मी स्पष्टपणे सांगू शकतो, असंही अजित पवारांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भारतीय संविधानाच्या उद्देशिके’चा विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करावा ! अजित पवार

News Desk

गोदावरी पाणी प्रश्नाबाबत आमदारांचा बेफिकीरपणा

Gauri Tilekar

नारायण राणेंचा पक्ष कोणता?

News Desk