HW News Marathi
महाराष्ट्र

“अहो त्या प्रीवेडिंगवाल्यांना कशाला अडवताय…” अजित पवारांनी दिला प्रेमळ दम

रायगड | श्रीवर्धनच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 30 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी श्रीवर्धनमध्ये बोलताना त्यांनी मिश्लिल वक्तव्य करत दम दिला आहे. श्रीवर्धन बीच सुशोभिकरणाचा नारळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढवला. प्रीवेडींग शूट करण्यासाठी श्रीवर्धनला येणाऱ्या जोडप्यांची प्रकरणं पोलीस ठाण्यात जातात, मात्र त्यांना चांगली वागणूक द्या, जेणेकरुन त्यांनी हनिमूनलाही इथेच आलं पाहिजे, असं मिश्किल वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

अजित पवार यांनी श्रीवर्धन बीच सुशोभिकरण प्रकल्पाचे भूमिपूजन केले. यावेळी अजित पवारांनी बीचची पाहणी केली. तसेच तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. बीच सुशेभिकरण, लॅंडस्केपिंग, झाडांची लागवड, वादळात हॉटेल कसे टिकतील, या सगळ्यांची इंजिनिअरकडून माहिती घेतली. यावेळी श्रीवर्धन लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, त्यांच्या कन्या आमदार अदिती तटकरे उपस्थित होत्या. बीचच्या वाळूबद्दल माहिती घेत तिचा रंग काळा पडल्याबद्दल अजित पवारांनी चिंता व्यक्त केली आहे.

अजित पवार काय म्हणाले?

दरम्यान, प्रीवेडिंग शूटसाठी इकडे कपल येतात, पण त्यांना श्रीवर्धनमध्ये स्थानिक लोक अडवतात, फोटो काढू देत नाहीत, वादावादी होते, प्रकरणं पोलीस स्टेशनपर्यंत जातात. पण असं करु नका, अडवू नका. त्यांना फोटो काढू द्या, इथलं पर्यटन इतकं वाढवा की लग्नानंतर जोडपी हनिमूनलाही इकडेच आली पाहिजेत. अॅनिव्हर्सरी असो, बर्थ डे असो सगळे कार्यक्रम इकडेच झाले पाहिजेत, असं इथलं पर्यटन वाढवा, असं अजित पवार मिश्कीलपणे म्हणाले.

पाच वर्षात चार वादळं आली. सरकार पाठिशी आहे, केंद्र सरकारचे नियम लहान असतील तरी साडेतीन पट पैसे देण्याचं काम राज्याने केलं. कोरोना कसा अटॅक करेल सांगता येत नाही. नियम ठरवून दिल्याप्रमाणे पालन करण्याचं आपलं काम आहे. आततायीपणा जीवावर बेततोय. कुणालाही वाटलं नव्हतं की महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना होईल, कामाला सुरुवात करताच कोरोनाने प्रवेश केला, असं अजित पवार म्हणाले.

“रायगडची ऐतिहासिक भूमी”

14 महिने झाले. राज्याच्या तिजोरीत श्रीवर्धनकडून 1 लाख येत होते, पण ते आता येत नाहीत. पवारांनी अनेक हल्ले, वादळं, दुष्काळ, गारपीट पाहिली, पण त्यातून न डगमगता राज्याला, जनतेला उभं करण्याचं काम केलं. ही भूमी ऐतिहासिक आहे. छत्रपतींचा वारसा आहे, महाडचं चवदार तळंही इथेच. सीडी देशमुख, कान्होजी आंग्रेंचा इतिहास आहे. त्यामुळे इथे आल्याचा आनंद असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

“कोकणाबद्दल शरद पवारांनाही प्रेम”

रायगडावर सुवर्णतुला चार जूनला झाली, त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे. 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. कोकणाबद्दल पवारांनाही प्रेम आहे. या परिसराचा कॅलिफोर्निया करावा, अशी त्यांची इच्छा आहे. राज्य सरकारने निधी देण्याचं काम केलं. मुंबई गोवा इथे फॉरेस्टची अडचण आहे. काम रखडलंय, आम्ही नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करतोय, लवकरच काम होईल अशी अपेक्षा आहे.

हेरीटेज ट्री संकल्पना

बाप-दादांनी लावलेली झाडं कोलमडून पडली तर पावसाळ्यात चौपट झाडं लावा. शंभर वर्षांपूर्वीच्या झाडांसाठी हेरीटेज ट्री ही संकल्पना आहे. ही झाडं तोडता येणार नाहीत, त्याला कायद्याचं संरक्षण असेल. वाऱ्याच्या वेगाला टिकणाऱ्या झाडांची वानवा आहे. लॅंडस्केपिंग करताना झाडांचा विचार व्हायला हवा, असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडीने आज मुंबईत येस बँकेच्या कर्जदारांवर छापे टाकले

News Desk

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावं

News Desk

खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल, शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप

News Desk