HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला उपमुख्यमंत्र्यांच्या खास शुभेच्छा!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज (२७ जुलै) ६०वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठीक १२ वाजता मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांनी ट्विट केलेला फोटो देखील काहीतरी सांगून जात आहे.

कालच (२६ जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सामनात मुलाखत झाली यात त्यांनी, गाडीचे स्टेअरींग माझ्याच हातात आहे असं म्हटले होते. मात्र, या फोटोत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच गाडीत बसले आहेत. मात्र, स्टेअरींग अजित पवारांच्या हातात आहे.

दरम्यान, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हीरक महोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास आहे.” अशा शुभेच्छा अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या ६०व्या वाढदिवशी दिल्या आहेत दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘८० वर्षाचा तरूण योद्धा’ नितेश राणेंच्या शरद पवारांना शुभेच्छा

News Desk

महाराष्ट्र औद्योगिक धोरण-2013 नुसार स्थापित एसईझेड

News Desk

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी लोकलने सीएसएमटी ते उल्हासनगर केला प्रवास!

News Desk