HW News Marathi
महाराष्ट्र

सह्याद्रीच्या  टोकदार अभेद्य कड्याप्रमाणे त्यांचे  नेतृत्व  देशाचे शक्तिस्थान ठरले !

मुंबई | फक्त ६ महिन्यांच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले नाही तर देशात अव्वल क्रमांकावर देखील आले. सर्व गोष्टींचा सारासार विचार करून मगच मैदानात उतरायचे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौशल्य. अशाच सर्व बाबी सामनाच्या अग्रलेखातून मांडत खास शुभेच्छा दिल्या आहेत.

जवळपास सहा महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात महाविकासआघाडीची सत्ता आली. राज्याचे नेत्तृत्त्व आपल्या खांद्यांवर पेलत, इतर पक्षांच्या नेतेमंडळींना सोबत घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक आव्हाने पेलली. अशा या मुख्यमंत्र्याचा आज ६०वा वाढदिवस.

आयुष्याच्या एका नव्या वळणावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आता राऊत यांनी हिमालयाचं नेतृत्त्व करण्यासाठी पुढची वाटचाल करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. अवघ्या सहा महिन्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत मुख्यमंत्री आणि एक राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून मुख्यंमंत्र्यांनी त्यांची संयमी बाजू दाखवली. सोबतच वेळ पडल्यास ते कठोर शासकही झाले, हीच बाब अधोरेखित करत सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीतही त्यांना अग्रस्थान मिळाल्याचं बाब अग्रलेखात नमूद करण्यात आली.

राजकीय वर्तुळामध्ये युवा नेते म्हणून पदार्पण करणाऱ्या ठाकरे यांच्यावर वयाच्या जवशळपास ‘साठी’च्याच टप्प्यात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. या प्रवासात त्यांनी चढउतार पाहिले, अपमान आणि टीकेचाही सामना केला. या साऱ्यामध्ये याची काही कुवत नाही, याला काही कळत नाही असं म्हणणाराच पक्षाचा सर्वोच्च नेता झाला आणि राज्याचा मुख्यमंत्रीही झाला. हे मुख्यमंत्र्यांचेच उदगार अग्रलेखात नमूद करण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी!

News Desk

आगीचं सत्र सुरुचं! मुंब्र्यात प्राइम हॉस्पिटलला आग, ४ रुग्णांचा मृत्यू

News Desk

नोंदणी करण्यापासून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत नागरिकांना मदत करा! : नाना पटोले

News Desk