HW News Marathi
महाराष्ट्र

आता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी राहणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुंबई | “राज्य सरकारने राज्यातील अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने यापुढे २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे”, अशी अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. राज्यासह देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. दरम्यान, संपूर्ण देश जारी लॉकडाऊन राहणार असला तरीही अत्यावश्यक सेवा-सुविधा या सुरूच राहतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वारंवार सांगितले आहे. मात्र, अत्यावश्यक वस्तू पुरवणारी दुकाने खुली राहणार असे वारंवार सांगूनही नागरिक या दुकानांवर गर्दी करत असल्याने आता दुकानांसमोरची ही गर्दी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज (२६ मार्च) कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने अन्न-धान्य, मेडिकल्स ही आता २४ तास सुरू ठेवता येणार आहेत. राज्य सरकारकडून ही परवानगी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या लोकांसमोर गर्दी केल्याने लोकांच्याआरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, यावेळी शासनाने केलेल्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात अशाही सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ही केमिकल लोचाची केस,” उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर खरमरीत टीका

Aprna

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान ‘मातोश्री’च्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच असलेल्या चहावाल्याला कोरोनाची लागण

News Desk

राणा दाम्पत्यांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, संजय पांडेंची केली तक्रार

Aprna