HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

देवेंद्र फडणवीसांवर अमित शाह, मोदींनी सोपवली नवी जबाबदारी

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये सध्या जोरदार राजकीय रणधुमाळी सुरू आहे. बिहारमध्ये मोठं यश मिळवल्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा एकदा मोठी नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. बिहारनंतर आता फडणवीस प्रचारासाठी पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहेत. भाजप आणि तृणमूल काँग्रेस राज्यात समोरासमोर आले असतानाच भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज आणि उद्या असे २ दिवस भाजपच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत.

बजबज आणि महेशताला अशा २ मतदारसंघांमध्ये सभा आणि यात्रा होणार आहेत. फडणवीस यांच्याकडे बिहारच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी यापूर्वी सोपवण्यात आली होती. एखाद्या राज्यात निवडणुक असल्यास इतर राज्यातील पक्षाच्या नेत्यांना त्या राज्यात प्रचाराला पाठवण्याची भाजपमध्ये पद्धत आहे. राज्यातील पक्षाचे नेते विनोद तावडे यांच्यावर पश्चिम बंगालच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे दरम्यान विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली २०११ आणि २०१६ साली तृणमूल काँग्रेसने सलग दोन वेळा सत्ता मिळवत राज्याच्या राजकारणात आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. सलग ३४ वर्षं सत्ता असलेल्या डाव्या पक्षांना हटवून तृणमूलने इतिहास निर्माण केला होता. यानंतर डाव्या पक्षांचं राज्यातलं अस्तित्वदेखील निवडणुकीत दिसेनासं झालं आहे. अशा वेळी सत्ताधारी तृणमूलला सत्तेवरुन हटवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

काॅंग्रेसला एक तर डाव्या पक्षांना लोकसभा निवडणुकीत भोपळाही फोडता आला नव्हता. तृणमूल आणि भाजपमध्ये थेट आमनेसामने लढत आहे. त्यामुळेच भाजपने सगळी ताकद पश्चिम बंगालमध्ये लावलेली दिसत आहे. म्हणूनच फडणवीस यांच्यासह देशभरातील भाजपचे प्रमुख नेते पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या आखाड्यात प्रचार करताना दिसणार आहेत.

Related posts

दिग्विजय सिंह यांची मुलगी श्रेयसी सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk

कोविडसंदर्भात आतापर्यंत राज्यात १ लाख १४ हजार गुन्हे दाखल

News Desk

चंद्रकांत पाटील हे पुरात वाहून आलेले उमेदवार !

Gauri Tilekar