HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यातील निर्बंधांबाबत अमृता फडणवीस संतापल्या….!

पुणे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने कोरोनाचा संसर्गाचं प्रमाणात नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांना ही सूट दिली आहे. तर ११ जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यात पुणे शहर आणि जिल्ह्याचाही समावेश असल्यानं सरकारविरोधात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सरकारने मुंबईतील निर्बंध शिथिल केलेले असताना पुण्यात का कायम ठेवले? असा सवालही केला जात असून, याच मुद्द्यावरून अमृता फडणवीस यांनी पुणेकरांना धरणे आंदोलन करण्याचा सल्ला दिला आहे.

पुण्याला वेगळा न्याय का?

पुण्यातली वेळ चार वाजेपर्यंतची आहे तर मुंबईत ही वेळ दहा वाजेपर्यंत आहे कुठेतरी हा पुण्यावर अन्याय आहे का? हा प्रश्न माध्यमांनी विचारल्यावर अमृता फडणवीस यांनी एच डब्ल्यू न्यूज मराठीला उत्तर देताना म्हटलंय की, अमृता फडणवीस म्हणाल्या, पुण्यात बाधित रुग्णांचा दर ४ असून, तरी देखील मॉल्स आणि इतर सर्व बंद ठेवण्यात आलं आहे. नागरिकांना चारपर्यंतची वेळ पुरेशी नाही. त्यामुळे रस्त्यावर गर्दी होत आहे. वेळ अधिकची देण्यात आली असती, तर नागरिकांनी गर्दी केली नसती. मात्र नागरिकांनी नियम पाळून खरेदी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. तसेच मुंबईत डेथ रेट अधिक असतानाही तिथे एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? पुण्यात हॉटेल सुरू करता येत नाही हॉटेल व्यवसायिक देखील अडचणीत आलेत, कमर्शियल औटलेट्स चालू करता येत नाहीयेत असे देखील अमृता फडणवीस म्हणाल्या, त्यामुळे प्रशासनाने जागं होण्याची गरज असल्याचं अमृता म्हणाल्यात.

अमृता फडणवीस कोण आहेत ?

एका वृत्तवाहिनीला अमृता फडणवीस यांच्या टीकेवर प्रतिक्रिया विचारली असता महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टिप्पणी केली आहे. कोण अमृता फडणवीस?, असा सवाल करत अमृता फडणवीस अनेक असू शकतात, असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना प्रतिक्रिया देत राहू द्या. मी त्याच्यावर पुन्हा प्रतिक्रिया द्यावी असे नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुटुंबप्रमुख आहेत. ते जे निर्णय घेतात ते सर्वसामान्यांच्या भल्यासाठी घेत असतात. त्याला वळण देण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगत अमता फडणवीस या राजकारण करत असल्याचे महापौर पेडणेकर यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परदेश शिष्यवृत्तीसाठी आता ६ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा

News Desk

मंदिर उघडल्यावर संक्रमण वाढले तर पुन्हा सरकारलाच दोष देणार- संजय राऊत

swarit

मराठा आरक्षण | स्वत: प्रकाश आंबेडकर कोल्हापुरात, मराठा मोर्चात होणार सहभागी

News Desk