HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा संताप, पडळकरांच्या पुतळ्याचे दहन

बीड | राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी भाजपचे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल (२४ जून) आक्षेपार्ह विधान केले होते. या संबंध महाराष्ट्रत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी यांनी तसेच नेते मंडळींनी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जाहीर निषेध व्यक्त करण्यास सुरुवात झाली. अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने पदळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या आहेत.

आज (२५ जून) याच वक्तव्याचा बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करत गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी संदीप क्षीरसागर यांच्यासह बीडमधील अनेक कार्यकर्त्यांनी आणि पक्षाच्या पदाधिकार्यांनी हजेरी लावून गोपीचंद पडळकर याचा जाहीर निषेध व्यक्त केला.

Related posts

नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत केली वाहनांची जाळपोळ

News Desk

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर

News Desk

साताऱ्यात ऐतिहासिक भवानी तलवारीची मिरवणूक

News Desk