मुंबई | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने देशमुख यांच्या २ स्वीय सहाय्यकांना समन्स बजावले आहे. २ स्वीय सहाय्यकांचे जबाब सीबीआय नोंदवणार आहे. सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीर सिंगांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते.
या पत्रात त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचे म्हटले होते. अनिल देशमुखांनी वाझेंना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना निधी गोळा करण्यासाठी सांगत, असे आरोप परमबीर सिंग यांनी या पत्रात केले होते.
त्यावर परमबीर सिंग यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका न्यायालयाने फेटाळली. मात्र, मुंबईच्या अॅड. जयश्री पाटील यांनी केलेल्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने सीबीआयला याप्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचा आणि पंधरा दिवसांत त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार सीबीआयने चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
Central Bureau of Investigation (CBI) has summoned two personal assistants of former Maharashtra Home Minister Anil Deshmukh to record their statement
CBI is investigating the allegations of former Mumbai police commissioner Param Bir Singh against Anil Deshmukh pic.twitter.com/FkKZ8pCfWE
— ANI (@ANI) April 11, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.