HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्या तोंडी ‘हे’ वाक्य टाकलं गेलंय ! अनिल देशमुखांनी ‘ते’ वृत्त फेटाळले

मुंबई | “महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी काही IPS अधिकाऱ्यांनीच प्रयत्न केले होते”, असे विधान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याच्या बातम्या रंगू लागलेल्या असतानाच आता स्वतः अनिल देशमुख यांनी यावर स्पष्टीकरण दिली आहे. ‘पोलिसांनी महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता’ असे वक्तव्य आपण केलेच नसल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. “माझ्या तोंडी हे वाक्य टाकलं गेलंय”, असेही गृहमंत्र्यांनी यावेळी म्हटले. अनिल देशमुख यांनी आज (२० सप्टेंबर) पुण्यात पत्रकार संघात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

अनिल देशमुखांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • ‘पोलिसांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता’ असे वक्तव्य मी केलेच नाही. माझ्या तोंडी हे वाक्य टाकलं गेलंय
  • ती बातमी संपूर्ण निराधार, व्हिडिओ क्लिपिंग पाहिल्यावर तुमच्या सत्य लक्षात येईल.असा कोणताही प्रकार घडला नाही.
  • अमिताभ गुप्ता यांच्या हातून मोठी चूक झाली. त्याचे समर्थन नाही. त्याची शिक्षा त्यांना दिली गेली. पण अमिताभ गुप्ता हे चांगले अधिकारी. त्यांचा आजवरचा ट्रॅक रेकोर्ड चेक केला गेला
  • पोलिस भरती प्रक्रिया ही मोठी आहे. साडे १२ हजार जागांसाठी जवळपास ५ ते ६ लाख अर्ज येण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याला ४ते ५ महिने लागतील.
  • साडे १२ हजार पोलिस भरतीमध्ये मराठा समाजासाठी १३ टक्के जागा ठेवण्याचा प्रयत्न. त्यासाठी कायदेशीर सल्ला घेणार, मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही.
  • राज्यात जवळपास २०८ पोलिस कोरोनाशी लढताना शहीद झाले आहेत.सरकार त्यांना आर्थिक मदत करत आहे.
  • शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना शाहिद पोलिसाच्या रिटायरमेंटपर्यंत घरात राहता येईल असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“फडणवीसांचा ‘हा’ आरोप हास्यास्पद आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही”, आव्हाडांचे प्रत्युत्तर

News Desk

‘करुणा शर्मांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर!’ कोठडीत 18 सप्टेंबरपर्यंत वाढ

News Desk

अॅड. गुणरत्न सदावर्तेंची दोन दिवसांची पोलीस कोठडी आज संपली, न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

Aprna