HW News Marathi
महाराष्ट्र

आजही चौकशीला हजर राहणार नाही, अनिल देशमुखांचं ईडीला पत्र!

मुंबई। 100 कोटी वसुली प्रकरणामुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अडचणीत सापडलेले आहेत. या प्रकरणी त्यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीकडून ( ED ) समन्स बजावण्यात आला आहे . तसेच त्यांचा – मुलगा ऋषीकेश यांना देखील समन्स बजावण्यात आला आहे . त्यांना आज सकाळी 11 वाजता मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र तिसऱ्या समन्सनंतरही अनिल देशमुख हे ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत.

तिसऱ्यांदा हे समन्स बजावण्यात आले आहे

राज्याचे गृहमंत्री या नात्याने अनिल देशमुख यांनी १०० कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केल्यानंतर, ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला.देशमुख यांना ४० कोटी रुपयांची खंडणी मुंबईतील बारमालकांकडून मिळाली असल्याची ठोस माहिती ईडीला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर, ईडीने देखमुख यांना याआधी तीन वेळा चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण वेगवेगळी कारणे देऊन ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यानंतर आता तिसऱ्यांदा हे समन्स बजावण्यात आले आहे.

देशमुख आजही ईडी समोर उपस्थित राहणार नाहीत

अनिल देशमुख ईडी समोर आज सुद्धा उपस्थित राहणार नाही, त्यांच्या वतीने वकील इंद्रपाल उपस्थित राहणार आहेत. याच अनुषंगाने अनिल देशमुख यांनी ईडीचा तपास अधिकाऱ्यांचे नावे एक पत्र जारी केले आहे. त्यानुसार त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून वकील इंद्रपाल बी सिंग हे उपस्थित राहतील असे पत्राद्वारे सांगितले आहे.

 

ईडीची माझ्या विरोधातील कारवाई ही कायदा आणि सत्तेचा गैरवापर म्हणून करण्यात आली. मी सुप्रीम कोर्टात यापूर्वीच आव्हान दिले असल्याने चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच सुप्रीम कोर्टात त्यांच्या अर्जावर 3 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. 30 जुलैला सुप्रीम कोर्टाने 3 ऑगस्ट ही तारीख देताच ईडीने सोमवारी समन्स जारी केला असे देशमुखांनी पत्रात लिहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हजारो सफाई कामगारांच्या कुटुंबांना मिळाली नोकरीची शाश्वती

Aprna

मंत्र्यांचे आजोबा-पणजोबाही वारीला जातात, वारीचा निर्णय सरकारने विचार करूनच घेतला

News Desk

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर; उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर अव्वल

Aprna