HW News Marathi
महाराष्ट्र

‘राज्याच्या राजकारणात पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा’, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार!!

अमरावती। राज्याच्या राजकारणात शिवसेना विरुद्ध भाजप हे चित्र अधिक गडद होताना दिसत आहे. आघाडीत बिघाडी होऊन पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युती होईल, अशी आशा काहीजणांना वाटत असते. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता शिवसेनेसोबत युती नको, अशी स्पष्ट भूमिका आज अमरावतीत मांडलीय. इतकंच नाही तर राज्याच्या राजकारणातील पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा म्हणून पाटील यांनी नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.

पण आता पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा समोर येतो

“स्वबळावर सत्ता आणण्याची तयारी आपली चालली आहे. सत्ता येईल नक्की. यापुढे कुणी नको आपल्याला युतीमध्ये. काही प्रामाणिक पक्ष आपल्यासोबत आहेत. आरपीआय, रयत क्रांती संघटना, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटेंचा शिवसंग्राम आपल्यासोबत आहेत. अजून काही छोटे-छोटे पक्ष आपल्यासोबत यायचं म्हणत आहेत. पण हे नाव मोठं आणि लक्षण खोटं आता नको. पाठीत खंजिर खुपसणारं एकच नाव महाराष्ट्राच्या राजकारणात होतं. पण आता पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा समोर येतो”, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवलाय. पाटील यांच्या या टीकेमुळं शिवसेना आणि भाजपमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पंढरपुरला मोदींना पंतप्रधान असताना चोर म्हणाले.

केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यात येत नाही. पहिल्यांदाच तुम्हाला बातमी देतोय. देशाच्या शिष्टाचारानुसार क्रम सांगायचा तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती , पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांना कोणतंही राज्य सरकार अटक करू शकत नाही. या सरकारचं गेल्या 20 महिन्यात काय चाललंय? कोण यांना सल्लागार मिळाला माहीत नाही. कोर्टात ते प्रत्येक विषयावर फटके खात आहेत. तसं आता खातील, असं सांगतानाच शिवसैनिकांनी केस दाखल करणं समजू शकतो. पण अटक? मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते. तेव्हा पंढरपुरला मोदींना पंतप्रधान असताना चोर म्हणाले. त्याचं काय करायचं? मुख्यमंत्री असताना दसरा मेळाव्यात त्यांनी जे भाषण काढा. त्यावर किती केसेस दाखल करायच्या?, असा सवाल पाटील यांनी केला होता.

केंद्राच्या पत्रकावरच तुम्ही राजकारण करणार असाल तर…

माननीय मुख्यमंत्री महोदय, म्हणत आहेत, आमचा सणांना विरोध नाही आमचा कोरोनाला विरोध आहे. गर्दी जमू नये असे वाटते मग मुंबईतले राज्यातले रेस्टॉरंट, बार, पब, येथे जमणाऱ्या गर्दीचे काय? आज आम्हाला केंद्राचे पत्र दाखवताय केंद्राच्या पत्रात बार, पब इथे गर्दी होणार नाही असे म्हटलेय का? आणि म्हणून केंद्राच्या पत्रकावरच तुम्ही राजकारण करणार असाल तर, केंद्राने तुम्हाला सांगितलं होतं टेस्ट वाढवा, वाढवल्यात का? मृत्यूचे आकडे लपवू नका, काय केलेत? केंद्राने सांगितलं होतं की, लसी समप्रमाणात राज्यभर द्या, मग जालन्याला सगळ्यात जास्ती लसी का गेल्या? ठाण्याच्या महापौरांनी आणि तुमच्या पक्षाच्या विधानपरिषदेचे आमदारांना रांग तोडून अगोदर लस कशा मिळाल्या? केंद्राने सांगितल्याप्रमाणे आरोग्य सेवकांचे लसीकरण संपूर्ण करा, अद्यापही हे झालेले नाही. केवळ सिलेक्टीव्ह राजकारण करू नका. सन 2019 पर्यंत शिवसेनेची घोषणा होती, “पहिले मंदिर बादमें सरकार” तर 2021 ला शिवसेनेची घोषणा बदलली आणि ” पहिले मदिरालय बाद मे मंदिर!”, अशी घणाघाती टीका शेलार यांनी केलीय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जलयुक्त शिवार योजनेचा फक्त बोलबाला, गृहमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

News Desk

उन्नत शेती-समृद्ध शेतकरी” उपक्रमाचा घेतला कृषी अधीक्षक डॉ. मोटे यांनी आढावा

News Desk

HW Exclusive: विषारी पाण्याचे गाव, १४ लाख लोकांचा जीव धोक्यात

News Desk