HW News Marathi
देश / विदेश

लोकसभेच्या लॉबीतच अरविंद सावंतांनी मला धमकावलं ! नवनीत राणांचा गंभीर आरोप

मुंबई । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. दरम्यान, राज्यातील या प्रकारचे तीव्र पडसाद हे आज (२२ मार्च) लोकसभेतही उमटलेले पाहायला मिळाले. भाजप खासदार गिरीश बाटप आणि खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. दरम्यान, संसदेत यावरून झालेल्या संपूर्ण गदारोळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

लोकसभेच्या लॉबीमध्ये अरविंद सावंत यांनी मला धमकावले !

नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे. आपण राज्यातील महाराष्ट्रातील प्रश्नांवर संसदेत आवाज उठवल्यामुळे अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप या पत्रामध्ये नवनीत राणा यांनी केला आहे. आपल्या या पत्रात नवनीत राणा म्हणतात की, “शिवसेना खासदार अरविंद सावंत हे लोकसभेच्या लॉबीमध्ये मला म्हणाले की तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच मी पाहतो. आणि तुलाही तुरुंगात टाकू”, असे म्हणत अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

इतकेच नव्हे तर याविषयी अरविंद सावंत यांच्याविरोधात पोलिसांत जाण्याची तयारी देखील नवनीत राणा यांनी दाखवली आहे. दरम्यान, परमबीरसिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या या आरोपांमुळे महाविकासआघाडी सरकारची मानहानी झाली असून संसदेतही हा मुद्दा प्रचंड गाजला.

लोकसभेचे कामकाज सुरू होताच शून्य प्रहारामध्ये भाजपने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून महाविकासआघाडी सरकारला घेरण्यास सुरुवात केली. यावेळी, ठाकरे सरकारवर टीका करताना भाजप खासदार गिरीश बापट, पूनम महाजन आणि अपक्ष खासदार नवनीत राणा चांगलेच आक्रमक झाले. यावेळी शिवसेना आणि भाजपच्या खासदारांमध्ये मोठी शाब्दिक चकमक झाल्याने सभागृहात गदारोळ झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#COVID19 : मुंबईत ८१ रुग्णांची नोंद, तर राज्यात कोरोना बाधितांची संख्या ७४८वर

News Desk

पंतप्रधान मोदींनी दिली एकतेची शपथ, देशभरात रन फॉर युनिटीचे आयोजन

News Desk

शेतकऱ्यांचा अंत न पाहता शेतकऱ्यांशी संवाद साधायला हवा-  रोहित पवार

News Desk