HW News Marathi
महाराष्ट्र

गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती होताच फडणवीसांनी काढली मनोहर पर्रीकरांची आठवण!

मुंबई। भाजपाने राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. पुढील वर्षी देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवत गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात भाजपाचं सरकार आणणार असा विश्वास व्यक्त केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.”आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने गोव्यात जे काही काम केलं आहे त्याच्या आधारे जनता पुन्हा एकदा आम्हाला निवडून देईल हा विश्वास आहे. गोव्यात गेल्या चार निवडणुका मी सातत्याने जात असून गोव्याचा परिचय आहे.

मनोहर पर्रीकर आमच्यासोबत नसणार

यावेळच्या गोव्याच्या निवडणुकीत मनोहर पर्रीकर आमच्यासोबत नसणार आहेत. मात्र त्यांनी पक्षाला दिशा आणि विस्तार दिला आहे त्याच्या आधारे निवडून येईल. महाराष्ट्र नेहमीच गोव्याच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि राज्यातील भाजपा गोव्याच्या निवडणुकीत सक्रीय राहिली आहे. त्यामुळे राज्यातील भाजपाकडून त्यांनी शक्य ती सर्व मदत केली जाईल,” असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

त्यामुळे मराठी माणसाचा आणि एखाद्या पक्षाचा पराभव यामध्ये फरक

“बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. मराठी माणूस पराभूत होऊच शकत नाही. बेळगावामध्ये संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे. भाजपाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये १५ पेक्षा जास्त मराठी लोक आहेत. त्यामुळे मराठी माणसाचा आणि एखाद्या पक्षाचा पराभव यामध्ये फरक आहे. कारण मराठी माणसाचा पराभव होऊच शकत नाही,” असं सांगत फडणवीसांनी संजय राऊतांवर उत्तर दिलं आहे.

तडस प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया

“मी रामदास तडस यांच्याशी बोललो. यावेळी त्यांनी मुलाचं रजिस्टर मॅरेज झाल्याचं सांगितलं. मी रामदास तडस यांनी समन्वयाने काम सर्व करण्याचं आणि कायदाचा अवमान न करण्याचा सल्ला दिला आहे,” अशी माहिती फडणवीसांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र!’

News Desk

फडणवीसांचे राजकारण इतके खुनशी असेल असे वाटले नव्हते – अमोल मिटकरी

News Desk

दिग्दर्शक महेश मांजरेकरांना खंडणीसाठी फोन, दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

News Desk