सातारा | राजकीय वर्तुळात नेत्यांनी, आमदारांनी एकमेकांच्या भेटी घेणं सुरुच असतं. अशात काही भेटी या अपेक्षित असतात तर काही अनपेक्षित असतात. तसेच, सगळेच पक्ष आपला पक्ष वाढवण्यासाठी मेहनत करत आहे. साताऱ्यात देखील भाजपकडून पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. आज (११ जुलै) भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दरम्यान, सातारा दौऱ्यावर असताना शेलार आगामी निवडणूकीसाठी रणनिती आखत असल्याचं सांगितलं जात आहे.
साताऱ्यात आज आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन संघटनात्मक चर्चा केली. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर सोबत होते! pic.twitter.com/YBbelqbymC
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 11, 2021
सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सध्या जवळ आल्या आहेत. या संस्थांच्या निवडणूकीत ठाकरे सरकारकडून विजय मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, भाजपने सातारा जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले असून जिल्हयात पक्ष वाढीसाठी सगळेच सक्षम असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आशिष शेलार आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाची मानली जात आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.