HW News Marathi
महाराष्ट्र

‘सामान्य माणसाचे डोळे उंदीर कुरतडतोय, तर शिवसेनेनं मुंबई महापालिकेलाच कुरतडलं’!

मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. श्वास घेताना दम लागत असल्यामुळे या तरुणाला २ दिवसांपूर्वी राजावाडी येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेवरुन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर आणि मुंबई महापालिकेवर जोरदार हल्ला चढवला आहे. सामान्य माणसाचे डोळे उंदीर कुरतडतोय, तर मुंबई महापालिकेला शिवसेनेनं कुरतरडलं असल्याची घणाघाती टीका शेलार यांनी केली आहे.

सामान्य माणसाचा जीव शिवसेनेने टांगणीला लावला आहे. सायन रुग्णालयात मृतदेहांच्या शेजारी रूग्णांवर उपचार केले जातात. तर राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उंदीर रुग्णांचे डोळे करतडत आहेत. ही मुंबई आणि महापालिकेची आजची स्थिती आहे. 80 हजार कोटीचं फिक्स डीपॉझिट, 1 हजार 200 कोटीच्या वर आरोग्याचं बजेट, मग या बजेटला कोण कुरतडत आहे? असा प्रश्न विचारतानाच हे पाप शिवसेनेचं असल्याचा गंभीर आरोप शेलार यांनी केलाय.

काय आहे प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार या तरुणाला श्वास घेताना दम लागत होता. नंतर त्रास असह्य झाल्यानंतर त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या तरुणाला मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचे समोर आले. या बाबतचे उपचार घेत असताना आज सकाळी त्याच्या नातेवाईकांना या रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. नंतर नातेवाईकांनी तपासले असता तरुणाच्या डोळ्यांना उंदराने कुरतडले असल्याचं समजतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहित पवारांच्या ‘त्या’ ट्विटवर अमृता फडणवीस म्हणतात…

News Desk

अमृता फडणवीसांचं भाऊबीजेच्या दिवशी भाऊरायांकडे ‘हे’ मागणं…

News Desk

महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य ‘सहकाराचा’ आणखी एक अंक-  अतुल भातखळकर

News Desk