HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत सेम टू शेम! 

मुंबई | केंद्र सरकार कृषि क्षेत्राशी संबंधित तीन विधेयक संसदेत मांडली असून, त्यापैकी दोन विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आली आहे. एक विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून, राज्यसभेत पारित व्हायचं आहे. मात्र, या विधेयकासंदर्भात शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेवरून भाजपानं चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेत वेगळी आणि राज्यसभेत वेगळी भूमिका घेतल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपने टीका केली आहे. “महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत सेम टू शेम!”, असे म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे.

“शिवसेनेनं सीएएचे लोकसभेत समर्थन आणि यू-टर्न घेऊन राज्यसभेत विरोध केला होता. आता कृषी विधेयकालाही लोकसभेत पाठिंबा आणि राज्यसभेत विरोधात भाषण करुन सभात्याग. म्हणजे महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत ‘सेम टू शेम!’ गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ!!”, असं म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर त्यांच्या परस्परविरोधी भूमिकेवरून टीका केली आहे.

Related posts

सांगली जिल्ह्यात मटक्याने पाय पसरले

अपर्णा गोतपागर

बिफ बाळगणे गुन्हा ठरणार नाही, उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का

News Desk

#MaharashtraElections2019 : राज्यात सकाळी ११ वाजपर्यंत १७.५० टक्के मतदान

News Desk