HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

काहीतरी पदरात पाडून घ्यावे याच हेतूने अशोक चव्हाण आणि केसरकरांची नाराजी !

मुंबई | महाविकासआघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा धुसफूस पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षानेही तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत केलेल्या निधीबाबतच्या विधानानंतर त्यांची नाराजी पुन्हा समोर आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चाही रंगल्या. यावर “अशोक चव्हाण असो वा दीपक केसरकर या नेत्यांची नाराजी ही आपल्या पदरात काहीतरी पाडून घेण्यासाठी आहे”, अशी टीका यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते ‘टीव्ही ९’ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

“शिवसेना नेते दीपक केसरकर यांची नाराजी त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच दूर करतील. मात्र, काहीतरी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी या नेत्यांची नाराजी आहे मग ते अशोक चव्हाण असोत किंवा दीपक केसरकर”, अशी विधान चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले आहे. दरम्यान, अशोक चव्हाणांनी आपल्या विधानावरून युटर्न घेऊन आपण हे विधान केलेच नसल्याचे म्हटले आहे. मात्र, काँग्रेसने आपली नाराजी व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी देखील निधीवरून काँग्रेस-शिवसेनेतील धुसफूस समोर आलीच आहे.

काय म्हणाले केसरकर ?

महाविकासआघाडी सरकारमध्ये दीपक केसकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही.  गेल्या अनेक दिवसांपासून ते राजकारणापासून दूर असलेले पाहायला मिळतात. दरम्यान, शनिवारी (३१ ऑक्टोबर) सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली नाराजी व्यक्त करताना केसरकर म्हणले कि, “मला स्वत:चे नाही पण सिंधुदुर्गाच्या वाट्याचे मंत्रिपद गेल्याचे दु:ख वाटते. यापूर्वी मला पंतप्रधान कार्यालयात बोलावून भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आली होती. पण तेव्हा मी भाजपमध्ये गेलो नाही.”

काय म्हणाले अशोक चव्हाण ?

अशोक चव्हाण म्हणाले होते कि, “काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला.” मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत पोहोचले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Related posts

सरकारचा रिमोट मुख्यमंत्र्यांच्या हातात नाहीच!ते दबावाखाली काम करतात,विखेंचा आरोप !

News Desk

“मी घर बदलणार नाही आहे तिथं आहे”, शिवसेनेच्या ऑफरवर पंकजा मुंडेंचे उत्तर

News Desk

शक्ती मिशन’चे संपूर्ण देशाला कौतुक, पंतप्रधानांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

News Desk