HW News Marathi
महाराष्ट्र

कंगना राणावतला द्यायची नुकसानभरपाई व वकिलांची फी मुख्यमंत्र्यानी यांनी स्वतःच्या खिशातून द्यावी-अतुल भातखळकर

मुंबई | कंगना राणावतच्या घरावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचा निर्णय देत उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जोरदार चपराक लगावली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून सूडबुद्धीने करण्यात आलेल्या कारवाईचा बोलविता धनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच होते, त्यामुळे ‘उखाड दिया’ म्हणणाऱ्यांनाच उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाद्वारे ‘उखाड दिया हैं’ अशी टीका भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अगोदर अर्णब गोस्वामी आणि आता कंगना राणावत यांच्या प्रकरणात न्यायालयाकडून आलेल्या निर्णयामुळे ठाकरे सरकार किती सूडबुद्धीने काम करीत आहे या वर शिक्कामोर्तब झाला आहे. आपला अहंकार जपण्यासाठीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई घडवून आणली असून कंगना राणावतला द्यायची नुकसानभरपाई आणि वकिलांना दिलेली करोडो रुपयांची फी उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या खिशातून द्यावी अशी आग्रही मागणी सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे.

सरकारच्या विरोधात टीका करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, मारहाण करणे, जेल मध्ये टाकणे व या ना त्या मार्गाने लोकांचा आवाज दडपण्याचेच काम हे ठाकरे सरकार करत असून ठाकरे सरकारकडून राज्यात छुपी आणीबाणी लागू केली गेली असल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विनायक मेटेंनी मानले सरकारचे आभार 

News Desk

‘ज्यांचा मुख्यमंत्री, त्यांचं सरकार’, संजय राऊतांचा हल्ला!

News Desk

‘ते नवीन उगवलेलं गवत आहेत’, विजय वडेट्टीवारांची गोपीचंद पडळकरांवर टीका

News Desk