HW News Marathi
महाराष्ट्र

‘ज्यांचा मुख्यमंत्री, त्यांचं सरकार’, संजय राऊतांचा हल्ला!

पुणे | शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत हे त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. खेड-शिरुरच्या सेना कार्यकर्त्यानी त्यांचं सकाळी जोरदार स्वागत केलं. अपेक्षेप्रमाणे राऊतांनीही जोरदार बॅटिंग केली. राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असलं तरी मुख्यमंत्री ज्यांचा असतो त्यांच सरकार असतं. सरकार आपलं आहे, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीच्या गडात जाऊन आपली ‘पॉवर’ दाखवली आहे.

ज्यांचा मुख्यमंत्री असतो त्यांच सरकार

“राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असलं तरी मुख्यमंत्री ज्यांचा मुख्यमंत्री असतो त्यांच सरकार असतं. सरकार आपलं आहे. शिवसेना दोन्ही पक्षांच्या (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) वर आहे. ही आपली पॉवर आहे”, असं म्हणत राऊतांनी सेनेची पॉवर दाखवण्याचा प्रयत्न केलं आहे.

दुसरीकडे “शरद पवार आपले आहेत. अजित पवार देखील आपले आहेत. दिलीप वळसे गृहमंत्री असतील, मात्र शिवसेना सगळ्यांच्या वर आहे, असं म्हणत शिरुर लोकसभा मतदारसंघात जाऊन त्यांनी राष्ट्रवादीला डिवचलं. तसंच भाजपला अजूनही शिवसेनेची गरज लागते”, असं म्हणत शिवसेनेचं महत्त्व अधोरेकित केलं आहे.

जुन्नर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकेल

संजय राऊत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुलवलं तसंच शिवसेना नेत्यांच्या मनातली बात खुलेआम बोलून दाखवली. कार्यकर्त्यांनो कामाला लागा, असे आदेश देतानाच शिरुर आणि जुन्नर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास वाटतो, असं राऊत म्हणाले. एकप्रकारे त्यांनी खा. कोल्हे आणि आमदार अतुलशेठ बेनके यांचा पराभूत करण्याचा मनसुबा बोलून दाखवला आहे.

चंद्रकांत पाटील यांना मी चंपा म्हणणं बरोबर नाही

संजय राऊत यांनी पुढे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “चंद्रकांत पाटील यांना मी चंपा म्हणणं बरोबर नाही. ते म्हणाले आमचे 105 आमदार आहेत, तरी आमचा मुख्यमंत्री नाही.. त्यांना वाटलं ते येतील, पण आले नाहीत”, असा टोला त्यांनी चंद्रकांतदादांना लगावला. तसंच चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्र्यांवरच्या टीकेला देखील राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. “आम्ही समोरुन कोथळा काढतो, पाठीमागून नाही… पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही.. शब्द तुम्ही फिरवला आम्ही नाही”, असं प्रत्युत्तर राऊतांनी चंद्रकांतदादांना दिलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तासगावात चिकनगुनियाची साथ, नगरपालिकेचे मात्र दुर्लक्ष  

News Desk

दिलासादायक बातमी ! आज मुंबईत ७७ नवे रुग्ण, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

News Desk

‘मुंबईमध्ये ड्रोन द्वारे जंतूनाशक फवारणी!’

News Desk