HW News Marathi
महाराष्ट्र

“खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या ६व्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर?”

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे गृहमंत्रीपदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय त्यांच्या नागपुरमधील घरासह इतर १० ठिकाणी देखील छापा मारण्यात आला आहे. या कारवाईवरून भाजप नेत्यांकडून आता महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी, “खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर? असा प्रश्न उपस्थित करत, खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे कोण हे आता उघड होईलच…”असं म्हणत टीका केली आहे.

“सीबीआयने अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल केला, हे अतिशय स्वागतार्ह आहे. आता या प्रकरणातील खरा सचिन वाझे कोण हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर FIR दाखल, घरावर सीबीआयचे छापे पडले असून निवासस्थानासह १० ठिकाणी सीबीआयच्या पथकांच्या धाडी. ना खाऊंगा ना खाने दूंगा हेच मोदी सरकारचे सूत्र आहे,” असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

तसेच, “खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे कोण हे आता उघड होईलच…खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर? अनिल देशमुखांवर झालेली कारवाई म्हणजे भ्रष्ट आणि सूडबुद्धीने राबवलेल्या सत्तेचे स्वाभाविक परिणाम. एका अनिलवर कारवाई पुरेशी नाही.” असं देखील भातखळकर म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणावरून बराच गोंधळ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांनाही हटवण्यात आलं. सिंग यांच्याकडून तपास चुका झाल्याचं विधान अनिल देशमुख यांनी केल्यानंतर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकला होता. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं होतं. ज्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप करण्यात आला होता.

या प्रकरणी परमबीर सिंग यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह या प्रकरणातील संबंधित इतरांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आहे. तसंच प्रकरणाच्या तपासाला अनुसरुन १० ठिकाणी सीबीआयकडून छापे मारण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जो संसदेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न करेल, अशा गोंधळी खासदारांना…’ रामदास आठवले

News Desk

‘आयर्न लेडी’ इंदिरा गांधींना सोनिया गांधी, राहुल गांंधीसह पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

News Desk

“राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत” अजित पवार

News Desk