HW News Marathi
महाराष्ट्र

बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतिनाथ महाराज यांच्यासह सहकाऱ्यांची हत्या, आरोपी अटक

मुंबई | नांदेडमधील नागठाणा येथील बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतिनाथ महाराज यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांची हत्या केल्याप्रकरणी अखेर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी आरोपी साईनाथ लिंगाडे (वय ३० वर्षे) नजीकच्या तेलंगणा राज्यातील तानुर येथून पोलिसांनी पकडले.

बालतपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांसह त्यांच्या दोन सहकाऱ्यांची काल (२३ मे) रात्री दीड वाजता हत्या केल्यानंतर साईनाथ लिंगाडे हा तेलंगणाला पळून गेला होता. गावातीलच एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला त्यानंतर गळा दाबून महाराजांची हत्या केली. आरोपीविरोधात ३५४चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच महाराजांच्या वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजूबाजूला लोकांनी जागे झाले. त्यामुळे मारेकऱ्याने तेथून पळ काढला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्या मठामध्ये शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला, त्याच मठातील बाथरूममध्ये अन्य एक मृतदेह सापडला. भगवान शिंदे अशी त्यांची ओळख ओळख पटली असून ते उमरीमध्ये रहिवासी होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रुग्णालयातून डिस्जार्च मिळाल्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा कामावर रुजू

Aprna

गुन्हा दाखल करणं तुमची जबाबदारी, तुम्ही तुमच्या कर्तव्यात कमी पडलात, हायकोर्टाने परमबीर सिंगांना फटकारले

News Desk

सोलापूरमध्ये शेतक-यांचा संप सुरूच

News Desk