आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने मोठे नेतृत्व बदल केले आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होतं.
त्याबरोबरच नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन या पाच जणांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष नेमणूक करताना प्रादेशिक संतुलनही सांभाळण्यात आलं आहे. नितीन राऊत, यशोमती ठाकूर हे विदर्भातील नेते आहेत, विश्वजीत कदम पश्चिम महाराष्ट्रातील आहेत, तर बसवराज पाटील मराठवाड्यातील नेते आहेत.
INC COMMUNIQUE
Hon'ble Congress President has appointed Sri @bb_thorat as President of Maharashtra Pradesh Congress Committee.
Dr. Nitin Raut
Dr. Baswaraj M. Patil
Sri. Vishvajeet Kadam
Smt. Y.C. Thakur
Sri. Muzaffer Hussain has been appointed as Working President pic.twitter.com/yE5ekkqNwu— INC Sandesh (@INCSandesh) July 13, 2019
लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला होता. काँग्रेसला राज्यात केवळ एका जागी विजय मिळाला होता. राज्यातील या पराभवाची जबाबदारी घेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसला मोठे धक्के बसत आहेत. अनेक मोठे नेते, आमदार शिवसेना-भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राज्यात पक्षनेतृत्व बदलाची गरज होती त्यामुळे राज्यात काँग्रेसने नव्याने पक्ष बांधणी केल्याचं समजत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.