मुंबई | दहशतवादी विरोधी पथकाने नालासोपाऱ्यातील सनातन संस्थेच्या तीन सदस्यांना अटक केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती.
दहशतवादी विरोधी पथकाने नालासोपारा येथून २० बॉम्ब तसेच काही स्फोटके जप्त केली आहेत. नालासोपाऱ्यातून वैभव राऊत तर शरद काळसकर आणि गोंधळेकर या दोघांना वसईतून अटक केले आहे. स्वातंत्र्य दिवस, ईद, गणपती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. या सणांमध्ये अनुचित घडविणे यामागचे षडयंत्र असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. तस भाजप सरकार सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणीवर गंभीर नसल्याचे चव्हाण यांनी बोलून दाखविले.
ATS had recovered 20 bombs & explosives for 50 more bombs. Vaibhav Raut & other 2-3 people from Sanatan Sanstha have been arrested. There is a big controversy behind this to polarize and break secular forces. This Sanstha should be banned: Ashok Chavan, Congress #Maharshtra pic.twitter.com/v3l2zdvxAF
— ANI (@ANI) August 12, 2018
सरकारी वकीलांकडून न्यायालयात याप्रकरणी मोठा गौप्यस्फोट करण्यात आला असून आरोपींकडून ८ नाही तर २० बॉम्ब जप्त करण्यात आल्याची माहिती वकीलांनी दिली आहे. तसेच ५० बॉम्ब बनू शकतील इतके साहित्यही जप्त करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.