HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचा ‘हा’ मोठा नेता मोदींच्या कानमंत्रावर चालतो ,राज्यपालांचा गौप्यस्फोट!

गोंदिया | ”मनोहर भाई पटेल यांच्याप्रमाणे मी देखील शेकडो शाळा उघडल्या, मात्र आपल्या वडिलांचे शाळांना नाव दिले नाही”, असा टोला राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी प्रफुल पटेलांना लगावला आहे. गोंदिया जिल्ह्याचे शिक्षण महर्षी मनोहर भाई पटेल यांच्या ११५व्या जयंती निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उपस्थिती लावली, त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेलांवर निशाणा साधला. तसेच प्रफुल पटेल हे मोदींच्या कानमंत्रावर चालत असल्याचं सांगत राज्यपालांनी खळबळ उडवून दिली आहे.

जिल्ह्यातील शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहर भाई पटेल यांचा ११५व्या जयंती निमित्त आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 19 प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गोंदियात सत्कार करण्यात आला. कोश्यारी यांनी आपल्या भाषणातून प्रफुल पटेलांना चिमटे काढले. स्वर्गीय मनोहर भाई पटेलांप्रमाणेच मी देखील शेकडो शाळा उघडल्या. मात्र आपल्या शाळांना वडिलांचे नाव दिले नाही, असा टोला राज्यपालांनी प्रफुल पटेलांना लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल हा भ्रष्टाचार आणि अपयश दडपण्याचा प्रयत्न !

News Desk

“राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष”, प्रवीण दरेकरांची जहरी टीका

News Desk

आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू! – मुख्यमंत्री

Aprna