HW News Marathi
व्हिडीओ

राष्ट्रवादीच्या संदिप क्षीरसागर यांचा बीडमध्ये ‘या’ पक्षाला दणका!

बीड मतदार संघात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. संदिप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर या काका पुतण्याचा संघर्ष महाविकासआघाडीमध्ये एकत्र अजूनही पेटलेले पाहायला मिळतो. ग्रामपंचायत निवडणुकीत ते पाहायला मिळालं. मात्र काका- पुतण्याच्या राजकीय युद्धात आता विनायक मेटेंच्या शिवसंग्रामला देखील मोठा धक्का सहन करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे चार नगरसेवक काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत गेल्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिवसंग्रामच्या एका बड्या नेत्याला फोडल्याने बीडमधील राजकीय समीकरण बदलले आहे. शिवसंग्रामचे विनोद हातांगळे यांच्यासह तब्बल 150 कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाल्याने शिवसंग्रामला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे संदिप क्षीरसागर आता पुन्हा एकदा ॲक्टिव्ह मोड मध्ये आले आहेत.

#Sandipkshirsagar #Jaydattakshirsagar #ncp #shivsena #vinayakmete #shivsangram #mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

shivsena dasara melava 2019 | दसरा मेळाव्याची पूर्वतयारी …

Arati More

Sujay Vikhe Patil BJP | पंतप्रधान मोदींचे २ हजार चालतात… मग कमळ का नाही ?

Gauri Tilekar

“तुमच्या चॅलेंजला भिकेची टोपली घालतो…’; आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजला संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर

News Desk