HW News Marathi
महाराष्ट्र

‘ ती महिला माझ्या मुलीसारखी होती’, भास्कर जाधवांची प्रतिक्रिया

रत्नागिरी | शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी काल(२६ जुलै) चिपळूणच्या बारपेठेत एका महिलेवर अरेरावी करण्याचा विडिओ व्हायरल झाला आहे. अनेक राजकारण्यांनी या गोष्टीवर टिक केली आहे. आमदारांचा सहा महिन्यांचा पगार दिला नाही तरी काही फरक पडत नाही सांगत महिलेच्या मुलाला आईला समजाव असं सांगतानाचा त्यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

ती महिला मला मुलीसारखी आहे

भास्कर जाधवांच्या वागणुकीलुमे ते सध्या चर्चेत आहेत. “मला यावर काहीच बोलायचं नाही. लोकांना मदत करणं हाच माझा प्राथमिक हेतू आहे. कालही मला लोकांना मदत करायची होती. ती महिला माझ्या मुलीसारखी होती. तिच्यासोबत किंवा माझ्या नातू किंवा भाचासारख्या असणाऱ्या मुलासोबतही मी बोलायचं नाही आणि तेसुद्धा कोणत्यातरी चॅनेलच्या प्रतिनिधीला विचारुन बोलायचं असेल तर काम कऱणं कठीण आहे. पण ज्यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरच सोशल मीडियावर लोक तुटून पडले आहेत,” असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

नेमकं काय घडलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल(२५ जुलै) चिपळूणच्या बाजारपेठेची पाहणी करत असताना एक महिलेने त्यांच्या पुढ्यात तिची व्यथा मांडली. मुख्यमंत्र्यांचं त्या महिलेकडे लक्ष गेलं, त्यावेळेस पीडित महिला म्हणाली, तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या. मुख्यमंत्री त्या महिलेला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. महिला आणि मुख्यमंत्री बोलणं सुरु होतं. पण भास्कर जाधवांनी हस्तक्षेप करत या महिलेला उत्तर दिलं. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला…बाकी काय… तुझा मुलगा कुठंय… अरे आईला समजव… आईला समजव… उद्या ये…, असं भास्कर जाधव तावातावाने बोलत होते.

भास्कर जाधवांना मी ओळखत नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल(२५ जुलै) चिपळूण दौरा केला. दरम्यान दुकानदारांशी बोलताना शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या अरेरावीचा विडिओ समोर आला आहे. प्रत्येक घडामोडींवर रोखठोक भाष्य करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणात मात्र संयमी प्रतिक्रिया दिली. “भास्कर जाधवांबाबत मी पाहिलं नाही, वृत्तपत्रांमध्ये वाचलं. त्यामुळे त्या सगळ्यावर तेच बोलतील. पण या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संयम ठेवणे गरजेचे आहे. लोकांचा आक्रोश वेदना समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि मुख्यमंत्री आणि सरकार हे करते आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मोहनदादा, आधी पुणेकरांसाठी घराबाहेर तर पडा’, महापौर मुलीधर मोहोळ यांचा सल्ला!

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘भारतीय सैन्य दिना’च्या  सर्वांना शुभेच्छा!

News Desk

राज्यातील ४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा – बाळासाहेब थोरात

News Desk