HW News Marathi
महाराष्ट्र

नागपूरात भीम आर्मीच्या मेळाव्याला कठोर अटींसह परवानगी

नागपूर | मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काल (२१ फेब्रुवारी) अटींसह भीम आर्मी संघटनेच्या वतीने रेशीमबाग येथे आज (२२ फेब्रुवारी) आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला परवानगी दिली आहे. खंडपीठाने दिलेल्या अटींचे जर उल्लंघन झाले तर त्याला जबाबदार असणाऱ्यांवर फौजदारी व न्यायालय अवमाननेची कारवाई केली जाईल. न्यायमुर्ती सुनील शुक्रे आणि माधव जामदार यांनी हा निर्णय दिला.

दरम्यान, या मेळाव्याला कोतवालीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी १७ फेब्रुवारीला नकार दिला होता. त्या नकाराविरुद्ध भीम आर्मीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका मंजुर करत उच्च न्यायालयाने या मेळाव्याला परवानगी दिली. भीम आर्मी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची विचारधारा विरुद्ध आहे. त्यामुळे या विरुद्ध विचारधारांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल अशी कारणे देत पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

न्यायालयाने दिलेल्या अटी पुढीलप्रमाणे-

  • आयोजकांनी दु.२ ते सायं ५ वाजेपर्यंतच हा मेळावा घ्यावा आणि मेळावा झाल्यानंतर लगेचच मैदान रिकामे करावे.
  • कार्यकर्ते कोणत्याही अटींचे उल्लंघन करणार नाही याची काळजी घ्यावी.
  • या मेळाव्याचे परिवर्तन आंदोलनात होऊ नये याचीही खबरदारी घ्यावी. मेळाव्याचा कोणत्याही राजकीय हेतूसाठी उपयोग करु नये.
  • देश व नागरिकांची प्रतिमा खालावेल किंवा देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचेल असे कोणतेही वक्तव्य करु नये.
  • मेळावा शांतता व सन्मानपूर्ण वातावरणात पार पाडावा
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उतार वयात इतकी बेइज्जती होऊ नये कुणाची”, भाजपचा शरद पवारांना टोला

News Desk

‘अखेर राज ठाकरेंनी मास्क वापरला,’ कारण…!

News Desk

सहाव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या

News Desk