HW News Marathi
महाराष्ट्र

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी सत्य दाबण्याचा प्रयत्न करु नये – देवेंद्र फडणवीस

पुणे | पुण्यातील वानवडी परिसरात एका तरुणीने केलेल्या आत्महत्येवरुन आता भाजपने सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये या प्रकरणासंदर्भात पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन सत्य बाहेर पाढले पाहिजे अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे हे प्रकरण दाब्याचं काम पुणे पोलिसांनी करु नये असंही फडणवीस म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे महानगरपालिकेला भेट दिली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आज गेल्या चार वर्षातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महापालिकेला भेट दिली.

यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये त्यांना वानवडी येथील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीशी संबंधित एका मंत्र्याचं नाव गोवलं जात असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, “मी सुद्धा या प्रकरणाची बातमी वाचली. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. समाज माध्यमांमध्ये काही क्लिप फिरत आहेत असंही मला सांगण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. यामधील सत्य काय आहे हे जनतेसमोर आणलं पाहिजे. एका तरुणीची अशाप्रकारे झालेली आत्महत्या आणि त्याच्या भोवती तयार झालेलं संक्षयाचं वर्तुळ आहे ते दाबण्याचा प्रयत्न पोलिसांनी करु नये. त्यासंदर्भात सत्य पोलिसांनी बाहेर आणावं,” असं मत व्यक्त केलं आहे.

काय आहे प्रकरण?

मुळची परळीच्या असणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने पुण्यात रविवारी मध्यरात्री आत्महत्या केली. ही तरुणी शिक्षणासाठी आपल्या भावासोबत पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आसपास तिनं महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच या तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच या तरुणीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जाऊ लागलं. पण या तरुणीच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मजकूर सापडल्याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करणारं निवेदनही भाजपच्या पुण्यातल्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षांनी आयुक्तांना दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शिवतीर्था’वर ऐकू येणार मोदींचा आवाज; राज ठाकरेंना मुनगंटीवारांकडून स्पेशल गिफ्ट

Manasi Devkar

फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण ‘मुख्यमंत्री’ हा उल्लेख टाळला !

Arati More

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक शिवसेना आघाडी सरकारसोबत एकत्र लढणार 

News Desk