HW News Marathi
देश / विदेश

भाजपने पंकजा मुंडेंवर सोपवली मोठी जबाबदारी!

नवी दिल्ली | भाजपचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर जे. पी. नड्डा यांनी पक्षाची नवी टीम तयार केली आहे. या नव्या धुरिणांमध्ये महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या नेत्यांची नावे देण्यात आली आहेत.भाजपच्या कार्यकारिणीची घोषणा नड्डा यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीचे प्रभारी म्हणून या अगोदरच मोठी जबाबदारी देण्यात आली होती. आता नव्या कार्यकारिणीत विनोद तावडेंसह पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. आणि पुन्हा एकदा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना डावलण्यात आले आहे.

 

गेल्या वर्षी निवडणुकीत अपेक्षा नसतानाही पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभा कुठेच जागा न मिळाल्यामुळे नाराजीच्या चर्चेला पुर्णविराम लागला आहे. आता पक्ष कार्यकारिणीत मोठी जबाबदारी पंकजा यांच्याकडे देण्यात आली आहे. विनोद तावडेंना तिकिट नाकारल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाने राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे. एकूण १३ जणांना National Secretary म्हणून नेमण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रालते ४ नेते आहेत. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांची नावे या यादीत आहेत.याशिवाय राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत खासदार हीना गावित यांना स्थान देण्यात आलं आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे नेतेम म्हणून जमाल सिद्दीकी यांचं नाव आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भाईयो और बहनो’, म्हणत राहुल गांधींनी केली पंतप्रधानांची नक्कल

Darrell Miranda

अयोध्या प्रकरणी आजपासून नियमित सुनावणी

News Desk

दिल्ली हिंसाचारातील आरोपी दीप सिद्धूला जामीन मंजूर

News Desk